लातूर जिल्हयातील एसटी वाहतुक व्यवस्थेचा
पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा
· प्रवाश्याचा प्रतिसाद लक्षात घेऊन् एसटी फेऱ्या वाढवा
· बसस्थानकाचे बांधकामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश
लातूर प्रतिनिधी : १७ ऑगस्ट २० :
लातूर जिल्ह्यातील सात बसस्थानकांची बांधकामे त्वरीत पूर्ण करावीत, बांधकामाचा दर्जा राखावा त्याच बरोबर लातूर शिवाजी चौकातील बसडेपोचा परिसर विकसित करण्या बाबत प्रस्ताव तातडीने सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी आढावा बैठकी दरम्यान दिले आहेत.
पालकमंत्री देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यां समवेत सोमवारी येथील विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली. बैठकी दरम्यान प्रारंभी सदयाची बसवाहतुक व्यवस्था, लातूर जिल्हयात बसस्थानकाची कामे परीवहन महामंडळाच्या अडचणी या बाबत त्यांनी माहीती करून घेतली. जिल्हयात सदया एकुण सात बसस्थानकाची बांधकामे सुरू आहेत यापैकी शिरूरअनंतपाळ बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असून उदगीर आणी कासारशीरशी बसस्थानकाची कामे सुरू होत आहेत. निलंगा, लामजना, औसा, देवणी या चार बसस्थानकाची कामे प्रगतीपथावर आहेत. या बांधकामाचा दर्जा राखला जावा अशी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. लातूर येथील शिवाजी चौकातील बसडेपोचे परीसराचा विकास करण्यासाठी यापूर्वी प्रस्ताव दाखल झाला होता. हा प्रस्ताव नव्याने तयार करून सादर करावा अशी सुचना त्यांनी केली.
लॉकडाऊन शीथील झाल्यानंतर जिल्हयातील पाच डेपोमधून प्रत्येकी दहा बसगाडया जिल्हातर्गत सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाश्याचा प्रतीसाद लंक्षात घेता या बसगाडया वाढवण्यात याव्यात असे निदे्रश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
या बैठकीस लातूर विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, औरंगाबाद विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश राजगीरे, विभागीस स्थापत्य अभियंता जगदीश कोकाटे आदी उपस्थित होते.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.