ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने कोरणा योध्दाचा सत्कार
उस्मानाबाद ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) शहरात कोरोना संकटकाळात नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या समाजसेवकांचा , संघटनाचा ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने शहरातील मर्चंट हाँल मध्ये छोटासा कार्यक्रम घेत या नागरिकांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक समान सत्कार समारंभ करण्यात आले ,
यावेळी शहरातील सर्व समाज सेवक , नगरसेवक , व डॉक्टर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फाउंडेशनच्या सदस्यांनी यावेळी लोक डाऊन काळात संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्व कामांची फोटोच्या माध्यमातील माहिती दिली व आज आम्ही काही मोजक्या आमच्या निदर्शनास आलेल्या व्यक्तींचा आम्ही सत्कार केला आहे समाजात अशा अनेक नागरिक आहेत जे वर्षाच्या बारा महिने कोणत्याही ही परिस्थितीत नागरिकांना रात्रीच्या अंधारात त्यांच्या घरापर्यंत मदत पोहचवतात त्यांच्या कार्यास आम्ही अभिवादन करतो असा संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.