उस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी
उस्मानाबाद( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) :-महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी, चेह-यावर कायम मास्क/स्वच्छ रुमाल वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असल्याने या बाबींचे पालन व्हावे. याकरिता असे गैरकृत्य करणा-या व्यक्ती विरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यासाठी आदेश जारी केले आहेत.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन प्रभावीपणे होण्याकरिता आदेशात दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदींनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत पूढील नमूद स्वरूपाचे गैरकृत्य करणा-या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करणे बाबतच्या आदेशात दुरुस्ती करुन पुढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
गैरकृत्याचे स्वरुप, प्रथम आढळल्यास करावयाची दंडात्मक कार्यवाही, दुस-यांदा आढळल्यास करावयाची कायदेशीर कारवाई ,कार्यवाही करणारा विभाग पुढीलप्रमाणे आहेत. सार्वजनिक स्थळी (रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय इ.) थुंकणे रक्कम रु. 500/- दंड फौजदारी कारवाई करणे , स्थानिक स्वराज्य संस्था (न.पा./न.पं./ग्रा.पं.) , संबंधीत शासकीय कार्यालयप्रमुख(कार्यालय क्षेत्रामध्ये) व पोलिस विभाग . सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क/स्वच्छ रुमाल न वापरणे /नाक व तोंड सुरक्षितपणे पूर्ण झाकलेले नसणे. रक्कम रु. 1000/- दंड फौजदारी कारवाई करणे. स्थानिक स्वराज्य संस्था (न.पा./न.पं./ग्रा.पं.), संबंधीत शासकीय कार्यालयप्रमुख (कार्यालय क्षेत्रामध्ये) व पोलिस विभाग.
दुकानदार/फळभाजीपाला विक्रेते / सर्व जिवनावश्यक वस्तु विक्रेते इत्यादी व ग्राहक यांनी सोशल डिस्टन्सिंग न राखणे. ग्राहकांमध्ये कमीत कमी 6 फूट (2 गज की दूरी) अंतर न राखणे. विक्रेत्यांने दुकानासमोर मार्कींग न करणे. ग्राहक/व्यक्तीं यांचेसाठी रक्कम रु. 200/- दंड आस्थापना मालक/दुकानदार/विक्रेता यांचेसाठी रक्कम रु. 500/- दंड . फौजदारी कारवाई करणे. स्थानिक स्वराज्य संस्था (न.पा./न.पं./ग्रा.पं.), पोलिस विभाग व संबंधित तालुक्याचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी. किराणा / जिवनावश्यक वस्तु विक्रेत्याने वस्तुंचे दरपत्रक न लावणे रक्कम रु. 1000/- दंड फौजदारी कारवाई करणे. स्थानिक स्वराज्य संस्था (न.पा./न.पं./ग्रा.पं.), पोलिस विभाग व संबंधित तालुक्याचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी.
दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती बसलेली असणे. तसेच हेल्मेट व मास्म परिधान केलेला नसणे रक्कम रु. 500/- दंड फौजदारी कारवाई करणे. स्थानिक स्वराज्य संस्था (न.पा./न.पं./ग्रा.पं.). पोलिस विभाग व संबंधित तालुक्याचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी. या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानन्यात येईल.
संबंधीत व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत कायदेशीर कारवाईस पात्र राहील. गैरकृत्य करणा-या व्यक्तींवर कार्यवाही करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी (मोबाईल इत्यादीद्वारे) करावी. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पोलीस विभागाची मदत घ्यावी, असेही आदेशात नमुद केले आहे.
******
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.