जिल्ह्यातील अनेक गावांत ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कामे झाले असल्याच्या नागरिकाच्या तक्रारीची शासनाने त्वरित दखल घ्यावी**

 * *जिल्ह्यातील अनेक गावांत ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कामे झाले असल्याच्या नागरिकाच्या तक्रारीची शासनाने त्वरित दखल घ्यावी**  





_____________________________

 *अन्यथा  तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिम आर्मी चे जिल्हा  महासचिव लक्ष्मण कांबळे यांनी दिला आहे*


प्रतिनिधी:----


लातूर जिल्ह्यातील अनेक गावच्या       मागील पाच वर्षापासून शासनाच्या विकासकांमामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकाद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. व गावच्या नागरिकांनी याची चौकशी व्हावी म्हणून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी याचे कडे  लेखी तक्रारी दिलेल्या असून 

 साधारणतः ग्रामिण भाग असल्याकारणाने गावात  ग्रामसेवकच हजर नसतात तर ग्रामसेवकांचे अनेक कामे उपसरपंचाद्वारेच भागवा भागवि केली जातात.गावातील  नागरिकांना विश्वासात न घेतातच  ग्रामसभा ह्या कागदोपत्रीच दाखवणे असे प्रकार अनेक प्रकार जिल्ह्यातील अनेक गावात झाले आहेत हे   स्थानिक नागरिकाद्वारे तक्रारी प्रशासनाला दिलेल्या आहेत.पण प्रशासनानेही दखल न घेतले मूळे जिल्ह्यातील अनेक गावच्या नागरीकात नाराजी  व्यक्त होताना दिसते आहे जिल्ह्यातील . गावात अनेक बोगस कामे झालेले आहेत,विहिरी,शौचालय,शोषखड्डे,पंतप्रधान आवाज योजना . अंतर्गत रस्ते  झोपडपट्टी  दुरुस्ती चे  इत्यादि  कामे तेराव्या   व चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कामेच झाले नसल्याचे जनतेचे म्हणणे आहे.केवळ कागदोपत्रीच कामे केली असल्याचे दाखवून बिले उचलली जातात,  डुप्लिकेट अधिग्रहण करून  बिल्ले उचलली जातात ,काहीजण गावाकरिता मोफत पाणी देतात तर त्यांच्या जागी दुसऱ्याचे नावे अधिग्रहनासाठी दाखवून परस्पर बिले उचलली जातात, जिल्ह्यातील अनेक गावांत शासनाचे लाखो रुपये खर्च करून मिळालेले पाणी फिल्टर धूळखात पडलेले आहे .त्याचा उपयोग  होत नसल्याचे अनेक गावांत पहावयास मिळत आहे .  *पाणी फिल्टर असून खोळंबा नसून  वळंबा. * मग ह्या योजनेचा लाभ कोणासाठी*  . गावात रोजगार हमी योजनेमध्ये खरे रोजगारी मागेच राहिले अन  लाभ उचलण्यासाठी मात्र  दुसरेच रोजगरी दाखले. बिगर रोजगारी याची नावे रोजगार हमी 

योजनेत असल्याने खरे लाभार्थी अनेक सुविधेपासून वंचित आहेत.रोजगार हमी चे जॉब कार्ड  व बँक पासबुक न देणे परस्पर बँकेतून पैसे उचलून  मजा मारणे.   यामुळे.जिल्हातील अनेक  गावात विकासासाठी आलेल्या  विकास कामात मोठ्या प्रमाणावर अफरातफर झालेल्या आहेत म्हणून  शासनाने कडे तक्रारी दिल्या आहेत .त्याची कसून चौकशी करण्यात यावी अशी सुजाण नागरिकाद्वारे मागणी करण्यात  येत 

आहे म्हणून **शासनाने या कडे डोळेझाक पणा करू नये* व  संबंधीत   तक्रारींची  गांभीर्याने दखल घ्यावी  चौकशी अंती दोषींवर कार्यवाही व्हावी 

अन्यथा  जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामपंचायत मध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र आंदोल छेडण्याचा इशारा  भिम आर्मी चे लक्ष्मण कांबळे यांनी दिला आहे


[[तक्रारीची शासन दरबारी दखल घेतली जात नसेल तर या गोरगरीब जनतेने दाद मागायची कोणाकडे  हा  जनतेला  पडलेल्या प्रश्नाचे उत्तर    प्रशासन देणार का ???]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या