कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने आदेश तात्काळ मागे घ्यावा गणेश माडजे :अन्यथा

कांदा  निर्यात बंदीचा केंद्र सरकारने आदेश तात्काळ मागे घ्यावा                                 गणेश माडजे :अन्यथा स्वाभिमानी करणार तीव्र आंदोलन      




                            लातुर :अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सापडलेला आहे. नुकताच कांदा दरवखढीने शेतकर्यांना थोडा दिलासा मिळाला होता. परंतु शासनाने निर्यात बंदीचा आदेश करून शेतकऱ्यांच्या कंबर्ड मोडले आहे संपूर्ण देशात शेतकरी या आदेशाला मान्य करत कांदा निर्यात बंदीचा आदेश काढुन केंद्र सरकारने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे आधीच लॉकडाउन मध्ये शेतकरी पुरता बरबाद झाला आहे या चुकीचा निर्णया विरोधात संपूर्ण देशात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कांदा जीवनावश्यक वस्तू मधुन काढला तरी शेतकर्यांनी आपल्या आदेशाचे स्वागत केले परंतु आता सुटाबुटातल्या अधिकार्‍यांचे ऐकुन केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा आदेश करून शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात लोटले आहे. म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करेल असा इशारा स्वाभिमानीचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश माडजे यांनी दिला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या