*केंद्राने विकलेल्या कंपन्या, रेल्वे, विमानतळांचा समविचार सभेच्या वतीने श्राध्द*
सोलापूर - देशाच्या स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक उन्नतीसाठी अनेक संसाधन उभी केली होती. यामध्ये दुरसंचार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पेट्रोलियम कंपन्या, अवकाश संशोधन केंद्र, रिझर्व्ह बँक, विमा कंपनी, विविध उद्योग, खनिज उत्खनन यासारख्या संसाधनांच्या माध्यमातून लाखो लोकांना स्थिर रोजगार मिळत होते. यांचा देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. सरकारी नियंत्रणाखाली असल्याने सार्वजनिक उत्पन्न मिळत होते. सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या संसाधनांची मुठभर उद्योजकांना विक्री करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करत आहेत, देशाची उन्नती होण्या ऐवजी उद्योजकांची उन्नती होत आहे. सार्वजनिक संसाधनांची नियंत्रण या भांडवलदारांच्या हाती आल्यावर यांचा सर्वसामान्यांना उपभोग घेणे जिकिरीचे होईल. अशा अतार्किक वृत्तीमुळे देशावरील कर्ज वाढत आहे आणि भांडवलदार श्रीमंत होत आहेत. भांडवलशाही धोरणामुळे विकासाचा दर कोसळत आहे. व्यवस्थेचा दर्जा घसरत आहे. सर्वसामान्यांना जाब विचारण्याचा अधिकार संपुष्टात येत आहे. बळकट लोकशाहीला हे घातक आहे.
आज सर्वपित्री अमावस्या असल्याने प्रधानमंत्र्यांनी आपल्या हटवादी भुमिका आणि भांडवलदार धार्जिणवृत्ती मुळे ज्या संसाधनांची विक्री केली आहे त्या संसाधनांच्या प्रतिकात्मक पोस्टरला फुल वाहून, नैवेद्य दाखवून श्राध्द घालण्यात आले.
या प्रसंगी राम गायकवाड, हसिब नदाफ, समिउल्ला शेख, विष्णू गायकवाड, यशवंत फडतरे, खालीक मन्सूर, संजय सावंत, सतिश कदम, महेश माने, पोपट भोसले, सागर बोधले आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.