नागरसोगा येथे पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ग्रामस्थांची मागणी.
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरसोगा येथील ग्रामस्थांनी आज दिनांक 21 सप्टेंबर 2020 सोमवार रोजी औसा तहसीलदार शोभा पुजारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात नागरसोगा येथील 23०० हेक्टर जमिनीचे क्षेत्र असून यापैकी १५०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे नागरसोगा परिसरात पडलेल्या सततच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मुगाच्या शेंगा ला झाडावरच कोंब फुटून संपूर्ण पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर पावसाच्या खंडा मुळे सोयाबीन पिकास पाण्याच्या कमतरतेमुळे त्यामधील सोयाबीन शेंगाच्या दाण्याची वाढ झालेली नाही. दिनांक 19 सप्टेंबर २०२० पासून सततच्या पावसामुळे पडलेल्या सोयाबीन पिकाच्या उभ्या झाडाला शेंगा चा अंकुर फुटून उगवण झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरसोगा परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी चिंताजनक झाली आहे. मागील वर्षी खरिपाच्या पेरण्या न झाल्यामुळे आर्थिक दृष्ट्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामा कडून मोठ्या अपेक्षा होत्या पण मागील दहा-बारा दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपक्षेवर पाणी फेरले आहे. याचा शासन व प्रशासनाने तात्काळ विचार करावा सोयाबीनचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी तसेच मूग उडीद आणि सोयाबीन या पिकाचा पिक विमा तात्काळ देण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावेत. खरीप हातचे गेले आता रब्बी पेरणी साठी शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध करून द्यावेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत नाही मिळाली तर अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरण्या करणे शक्य होणार नाही त्यामुळे आमच्या या निवेदनाची शासन व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये शासकीय मदत द्यावी अशी विनंती नागरसोगा येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी या निवेदनावर निर्मला व्यंकट फावडे, चंद्रकांत पांडुरंग फावडे, विशंभर दत्तोबा सूर्यवंशी, चव्हाण अमित सिंग उमराव सिंग, अभिलाष रवींद्र फावडे, दिनकर शेषराव माळी, सुशिलाबाई अंकुश भोजने, ज्ञानेश्वर सुग्रीव सूर्यवंशी, भास्कर चंद्रभान सूर्यवंशी आदिचे सह्या आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत नाही मिळाली तर अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरण्या करणे शक्य होणार नाही त्यामुळे आमच्या या निवेदनाची शासन व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये शासकीय मदत द्यावी अशी विनंती नागरसोगा येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी या निवेदनावर निर्मला व्यंकट फावडे, चंद्रकांत पांडुरंग फावडे, विशंभर दत्तोबा सूर्यवंशी, चव्हाण अमित सिंग उमराव सिंग, अभिलाष रवींद्र फावडे, दिनकर शेषराव माळी, सुशिलाबाई अंकुश भोजने, ज्ञानेश्वर सुग्रीव सूर्यवंशी, भास्कर चंद्रभान सूर्यवंशी आदिचे सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.