शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी: एम आय एम पक्षाची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा/प्रतिनिधी: खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद व मूग ही तीनही पिके हातची गेली असून त्याची नुकसान भरपाई म्हणून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने दि.२३ सप्टेंबर 2020 बुधवार रोजी औसा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात खरीप हंगाम 2020 मध्ये मान्सून पूर्व पावसाची सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाने उडीद, मुग, सोयाबीन पिकाची पेरणी केली त्यात काही कंपन्यांच्या सोयाबीन डुप्लिकेट बाजारात विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यात शेतकरी आर्थिक संकटात सापडला त्यातच मध्यंतरी पावसाने धरल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. दिनांक तेरा ते 20 ऑगस्टपर्यंत सतत रिमझिम पाऊस पडून मूग आणि उडीद पिकावर कोंब फुटल्याने दोन्ही पिके नष्ट झाली तसेच 19 सप्टेंबर पासून सतत पडलेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीन पाण्यात गेले सोयाबीन पिकाला पाणी लागल्यामुळे व सोयाबीन पिकास झाडावरच कोंब फुटत असल्याने शेतकऱ्यांचे नगदी पिकांचे नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे तरी महसूल व कृषी विभागामार्फत मराठवाड्यासह सर्व महाराष्ट्रातील सततच्या पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकाचे सरसकट पंचनामे करून आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे अशी मागणी एम आय एम पक्षाच्यावतीने औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर एम आय एम जे सीनियर नेते अडवोकेट गफुरूल्ला हाश्मी, एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली ईनामदार, इलियास चौधरी, शेख फजले रहीम,आदिचे सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.