भारतीय संस्कृती गुरूला सर्वश्रेष्ठ माननारी आहे. - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 

भारतीय संस्कृती गुरूला सर्वश्रेष्ठ माननारी आहे.
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर





लातूर दि.05-09-2020

पुरातन काळापासून भारतामध्ये गुरूला राजसत्तेपेक्षत्त श्रेष्ठ मानण्याची परंपरा आहे. ती आपण गुरू वशिष्ट विश्‍वमित्र व वाल्मिकी ऋषिीच्या माध्यमातून पहिली आहे. मातृ देवो भवः पितृ देवो भवः तदंतर आचार्य देवोभवः अशी आपली विचारसरणी आहे. यामुळे गुरूजनासाठी समाज राष्ट्राबरोबर मानव घडविण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांना वैयक्‍तिक भावनांचा त्याग करून समाजामध्ये आदर्श स्थापीत करण्यासाठीचे कार्य करणे अपेक्षीत आहे. यासाठी एका विचारवंताने म्हटले आहे आदर्शवान व्यक्‍ती मेला तरी चालेल  परंतु आदर्श जीवंत राहिला पाहिजे. कारण त्याकडे पाहून समाज, देश चालतो. असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र कॉलेज मजगे नगर येथील आयोजित कायक्रमात जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेएसपीएम संस्थेचे प्रशासकीय समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शैक्षणिक संचालक संभाजीराव पाटील, समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य गोविंद शिंदे, उपप्राचार्य मारूती सुर्यवंशी, मुख्याध्यापिका सुनिता मुचाटे, सौ.अरूणा कांदे, सौ.अफरोज पठाण, मुख्याध्यापक मोहन खुरदळे, संजय बिरादार,  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, आज सर्वपल्‍ली राधाकृष्णन यांची जयंती गुरूजनांचा दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मी जेएसपीएम संस्थेच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांचा आपण होऊन पुष्पगुच्छ देवून सन्मान करत आहे. यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढत आहे. आजच्या पवित्र दिनी आपण सर्वांना तरूणांना शक्‍तीशाली बनवून जगाचे नेतृत्त्व करण्याची संधी निर्माण करून देण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे.
प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्‍ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पुजन जेएसपीएम संस्थेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षक दिनानिममित्त जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्‍या विविध युनिटच्या 21 शिक्षकांचा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा
21 वे शतक बौध्दिक संपदेचे शतक आहे. जगाचे सर्व विषयाचे ज्ञान हे यु-ट्युब, इंटरनेट सुविधामध्ये बंद आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार करून तरूण तेजस्वी बनत आहेत. त्याल अधिक समर्थ बनविण्यासाठी गुरू जणांनी नवीन तंत्रज्ञानचा स्वीकार करून ट्रेनिंग व चिंतणातून गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. भारताने नवीन सी.बी.सी.एस.शिक्षणपध्दती आणली आहे. ती निश्‍चितच देशातील गावापासून ते देशापर्यंत व जगाला लागणारी सुविधा व ज्ञान पुरवेल व देशातील बरोजगारी दूर होऊन देशाला स्वयंभू व शक्‍तीशाली बनवेल असेही शेवटी बोलताना कव्हेकर म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालिब शेख  यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, एससीव्हीसी आणि सी.एस.एन.स्कुलचे सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या