वैधकिय प्रवेशासाठी ७०-३० ची अट रद्द करा मागणीवर मराठवाड्यातील आमदार आक्रमक..
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आ. अभिमन्यू पवार यांनी मानले आभार..
औसा - मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरलेली वैधकिय प्रवेशासाठी ७०-३० ची अट करावी या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदारांची दि. ७ सप्टेंबर रोजी विधिमंडळासमोर आंदोलन केल्याची माहिती औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
या आंदोलनाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेत अधिवेशनाचे दुपारचे सत्र संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या कक्षेत मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांची बैठक घेतली या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह मराठवाड्यातील १० आमदार उपस्थित होते.मराठवाडयातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा ७०-३० चा फॉर्म्युला त्वरित रद्द करावा अशी एकमुखी मागणी केली.हि अन्यायकारक अट रद्द करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.आता विषयावर सभागृहात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख निवेदन करणे बाकी आहे.या नंतर यावर अध्यादेश निघू शकतो दरम्यान मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैधकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी त्याचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.