व्यंकटराव पनाळे यांच्या पत्राने उस्मानाबाद जनता बँकेच्या संचालक मंडळाला जबरदस्त हाबडा ! जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बेकायदेशीर व नियमबाह्य बोलावलेली सर्वसाधारण सभा केली रद्द

 व्यंकटराव पनाळे यांच्या पत्राने उस्मानाबाद जनता बँकेच्या संचालक मंडळाला जबरदस्त हाबडा ! 


जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बेकायदेशीर व नियमबाह्य बोलावलेली सर्वसाधारण सभा केली रद्द !! 


बँकेच्या सभासदांनी केला व्यंकटराव पनाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव. 






लातुर : दि. १६ - उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने दि. २० सप्टेंबर रोजी बोलावलेली सर्वसाधारण सभा ही नियमबाह्य व बेकायदेशीर असून या सर्वसाधारण सभेच्या विरोधात बँकेचे सभासद व ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी श्री. कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली होती . 

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची सभासद संख्या ७२८४३ असुन या सर्व सभासदांना बँकेचा छापील अहवाल पाठवून  सर्वसाधारण सभेबाबतचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. बँकेने दि. २० सप्टेंबरला रविवारी दुपारी १ वाजता श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभाग्रह, उस्मानाबाद येथे ही बेकायदेशीर व नियमबाह्य सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती. 

सदरची बोलावलेली सर्वसाधारण सभा मा. संचालक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवी दिल्ली यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारणसभा कशा पद्धतीने घ्यावी याचे नियम घालून दिलेले आहेत त्याचे अनुकरण करूनच वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी अन्यथा ती बेकायदेशीर सर्वसाधारण सभा रद्द करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे सभासद तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली होती. 

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सदर नियमावलीची व मार्गदर्शक तत्वाची कुठलीही अंमलबजावणी न करता सदरची सर्वसाधारण सभा नियमबाह्य व बेकायदेशीर बोलावलेली असल्याने दिनांक १० सप्टेंबर वार गुरुवार रोजी व्यंकटराव पनाळे यांनी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन व श्री. कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना भेटून सदरील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने बोलावलेल्या नियमबाह्य व बेकायदेशीर सर्वसाधारण सभेविषयीच्या तक्रारीचे निवेदन देऊन ही बेकायदेशीर व नियमबाह्य सर्वसाधारण सभा कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रद्द करण्यात यावी अशी मागणी व्यंकटराव पनाळे यांनी केली होती. 

व्यंकटराव पनाळे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन आणि कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उस्मानाबादचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळास ही सर्वसाधारण सभा रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाला जबरदस्त हाबडा बसला आहे. ही सर्वसाधारण सभा नियमाला धरून रद्द केल्याबद्दल जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे व्यंकटराव पनाळे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तर बँकेच्या सभासदांनी ही सर्वसाधारण सभा रद्द करून घेण्यासाठी व बँकेच्या संचालक मंडळाचे मनसुबे उधळून लावल्याबद्दल व्यंकटराव पनाळे यांचेवर बँकेच्या सभासदांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या