ग्रामसेवक बोले तैसा ग्रा प प्रशासक चाले
असाच चालणार ग्रामपंचायत कारभार.... ?
भूम
भूम तालुक्यातील ज्या ग्रा.पं.चा पचवार्षिक कार्यक्राळ १२ ते २९ सप्टेंबर दरम्यान सपत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या विभागातील विस्तार अधिकारी सारख्या जबाबदार अधिकाऱ्याची प्रशासक पदी नियुक्ती झाल्याचे दिसून येत आहे .त्यांच्या मदतीला मात्र गाव परिसराची माहिती असलेल्या ग्रामसेवकाची प्रशासकीय गावचा अधिकारी म्हणून मदत होणार आहे यात शंका नाही...म्हणजे ग्रामसेवक बोले तैसा ग्रा प प्रशासक चाले अशी गत होवू नये हिं अपेक्षा .
भूम तालुक्यात एकूण ७४ ग्रामपंचायत आहेत . यातील पाटसांगवी , वारेवडगाव -कासारी, वागी वगळता ७१ ग्रामपंचायतचा कार्यकाळ १२ ते २९ सप्टेंबर दरम्यान संपत आहे .दरम्यान ज्या दिवशी मुदत संपत आहे त्याच्या दुसऱ्याच दिवशी पदभार घेता यावा यासाठी नियक्त प्रशासकाची यादी प्रसिध केल्याचे दिसत आहे . सोनेवाडि आणि गिरवली या २ ग्रामपंचायतचा कार्यकाळ नोव्हेबर मध्ये संपणार आहे
ग्रामपंचायत प्रशासन नियुक्तमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी , पंचायत . सांस्थिकी , कृषि, आरोग्य ,उमेद , आय आर डि पी , समान्य / ए बाविचे विस्तार अधिकारी , कृषि अधिकारी , शाखा अभियंता ,, कनिष्ठ अभियंता , ग्रामीण पाणी पूरवठा , ल . पा . तसेच एन आर एम एम , मुख्याध्यापक केंद्रीय मुख्याध्यापक , महिला बा.क . पर्यवेक्षिक , अंगणवाडी पर्यवेक्षका यांचा समावेश आसल्याचे हॉटसअपवर फिरत असलेल्या यादीवरून दिसत आहे यांच्या मदतीला संबधीत गावचे ग्रामसेवक राहणार यात शंका नाही.
नियुक्त केलेले बहूतांश कर्मचारी हे तालुक्या बाहेरचे आणि आपआपल्या कार्यालयात बसून कामकाज कारणारेच असणार आहेत .त्यांना गाव विकासाच्या वेदनेचं गांभिर्य निश्चितच नसणार . शासनाने नियूक्त केले म्हणजे त्यांना गावगाडा निश्चितच हाकावा लागणार , गावातल्या गटबाजीला सामोरे जावे लागणार , यात विनाकारण चांगल्या अधिकाऱ्यांना तक्रारीला सामोरे जावे लागणार आहे , चांगलेपणावर गालबोट लागणार आहे
प्रशासकांकडे एक नव्ह दोन नव्ह तीन चार ग्रामपंचायतचा पदभार दिला आहे. यामुळे प्रशासकास मुळ पदभार सांभाळून , वरिष्ठांच्या बैठका , ऐन वेळची काम हाताळून पदभार असलेल्या गावातला जनतेचा समतोल , गाव विकासाचा समतोल राखावा लागणार आहे , नवनवीन समस्येला , तक्रारिला सामोरे जावे लागणार आहे. एक तर गावात लहान मोठया राजकिय पक्षासह विविध संघटना , व्यक्तीगत मंडळ पदाधिकाऱ्यांचे मोठे मंडळाचे पेव फुटलेले आहे . समजून घेण्याची अनेकजण क्षमता ठेवतं नाही . यामुळे कायदेशीर, बेकायेदेशिर कामे नाहि झाली, विलंब झाला तर नाहक वरिष्ठांकडे तक्रारी करणारांची संख्या कमी नाही .
यात प्रसंगी प्रशासकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता काहि काळ आहे ,त्यांनाच प्रशासक किवा मुदतवाढ देणे सोयीचे होते . गाव स्तरावर रुटिंग बसलेले असल्याने सर्व बाबी सुरळीत होण्यास मदत झाली अंसती . प्रशासक नियूक्त केले तरी मंत्रीमहोदय , गाव स्तरावरील कार्यकर्ते शांत बसणार नाहीत हे तेवढेच खरे आहे ,.नेत्यांनाही कार्यकर्त्याचा फौजफाटा हाताळावा लागतो , सांभाळावा लागतो . यामुळे हा प्रशासकिय कार्यकाळही अधिक काळ राहिल असे वाटत नाही
काहिही असो गावची , गावातल्या नेत्याची , गटबाजीची , गावच्या परिघाची खडानखडा माहिती आणी नस माहित असलेल्या ग्रामसेवकाच्या माहितीवरून प्रशासकांना गावगाडा चालवावा लागणार म्हणजेच ग्रामसेवक बोले तैसा ग्रामपंचायत प्रशासक चाले हि म्हण वास्तवात येवू नये म्हणजे झाल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.