महाविकास आघाडी सरकार
मराठा समाजाच्या भावनेशी एकरूप
मराठा आरक्षण टिकवीण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात
शासन भक्क्मपणे बाजू मांडेल
शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती बाबत
मार्ग काढण्याचे सरकारचे प्रयत्न
ना. अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : १७ सप्टेंबर २० :
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार मराठा समाजाच्या भावनेशी एकरूप असुन मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, यातून अनुकूल असाच निर्णय येईल असा विश्वास व्यक्त करून स्थगीतीच्या काळात शैक्षणिक प्रवेश तसेच नोकर भरतीच्या बाबतीत मराठा समाजाचे नुकसान होणार नाही यादृष्टीने शासन प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
मराठा आरक्षण संदर्भातील खटला घटनापीठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे यावरून मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे, आरक्षण कायम टिकावे यासाठी लोकप्रतिनिधीनी अधिक प्रयत्न करावेत म्हणून मराठा महामोर्चाच्या वतीने त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे.
लातूर तालुक्यतील बाभळगाव निवासस्थान येथे मराठा समाज कार्यकर्त्यांची वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी भेट घेतली. त्यांच्याकडून निवेदन स्विकारले मराठा आरक्षण संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून हे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाने भक्कमपणे बाजू मांडली आहे हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करतांना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच लागेल असा विश्वास आहे असे नमूद करून स्थगिती काळात शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती बाबत समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने शासन गंभीरपणे विचार करीत असुन राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे एक दोन दिवसात या बाबतीत निर्णय जाहिर करतील अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी भक्कमपणे मांडली आहे. आता याहूनही अधिक भक्कमपणे आरक्षणाची बाजू मांडून शासन मराठा समाजाला न्याय मिळवून देईल. या शिवाय महामंडळाकडून कर्ज, पोलिस भरतीतील संधी, मराठा आंदोलकावरील दाखल झालेले गुन्हे परत घेणे यासारख्या मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आपली पुर्वीपासुनची भुमिका आहे आणि हे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी आपण सक्रीय अहोत असे सांगून महामोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी सदयाच्या कोविड१९ महामारीच्या काळात आंदोलन करतांना वैयक्तिक आंतर पाळावे, सॅनिटायझर, मास्क या सुरक्षा सांधनांचा वापर करावा व स्वताची काळजी घ्यावी असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.