कोविड१९ महामारीच्या काळात जिल्ह्यातील
काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाजसेवेचा लातूर पॅटर्न निर्माण करावा
ना.अमित विलासराव देशमुख
पक्षसंघटनेचा विस्तार करून अधिक सक्षम
करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे
लातूर प्रतिनिधी : १८ सप्टेंबर २० :
काँग्रेस पक्षाला त्यागाची, सेवेची मोठी परंपरा आहे ही परंपरा कायम राखत. लातूर शहर जिल्हा व जिल्हा काँग्रेसने कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक बूथ, प्रभाग, गाव, तालुका येथे कोरोना सहाय्यक कार्यकर्त्यांची नियुक्ति करून त्यांच्या मार्फत रुग्णांच्या व नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडवाव्यात त्यांना आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन करून यातून निर्माण होणारा समाजसेवेचा लातूर पॅटर्न राज्यासमोर एक आदर्श पॅटर्न पूढे येईल असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नुतन अध्यक्ष श्रीशैल उडगे व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांच्या पुढाकारातून लातूर शहर व जिल्हयातून पदाधिकाऱ्यांची संयुक्त संवाद बैठक गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील गिरवलकर मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे मावळते अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे मावळते अध्यक्ष मोईज शेख यांचा सत्कार ना.अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख मार्गदर्शन करीत होते.
या बैठकीस माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश्वर निटुरे, माजी जिल्हाध्यक्ष ॲड.व्यंकट बेद्रे, माजी शहराध्यक्ष मोईज शेख, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब सवई, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मन्मथआप्पा किडे, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, चाकुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील, औसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेषराव पाटील, अशोक गोविंदपूरकर, अभय साळुंके, समद पटेल, माजी महापौर स्मिता खानापुरे, सपना किसवे, पृथ्वीराज शिरसाट, संभाजी सुळ, लक्ष्मण कांबळे, संजय ओव्हळ, दगडूसाहेब पडिले, प्रवीण सूर्यवंशी, सुपर्ण जगताप, शरद देशमुख, नगरसेवक रविशंकर जाधव, रत्नदिप अजनीकर, सचिन बंडडापल्ले, सिकंदर पटेल, बाबासाहेब पाटील उजेडकर, दत्तोपंत सूर्यवंशी, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विजय निटूरे, महेश काळे, व्यंकटेश पुरी, ॲड.देविदास बोरूळे, सचिन गंगावणे, बिरबल देवकते, रफिक शेख, किरण पवार, बबन ढगे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभीच उपस्थितांनी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, औश्याचे माजी नगराध्यक्ष मुजबुद्दिन पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड.विक्रम हिप्परकर,एस.एस.पाटील आलमलेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या बैठकीत मार्गदर्शन करताना ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले की,कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यावर्षीचे वर्ष व पुढचे येणारे वर्ष सुद्धा प्रत्येकाला कोरोना पासून बचाव करूनच जगावे लागेल. जोपर्यंत कोरोना मुक्त लातूर होत नाही तोपर्यंत सर्वांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे.
लातूर जिल्हया हा काँग्रेस नेतृत्वाची खाण आहे आदरणीय माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, तसेच माजीमंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कार्याचा आदर्श आपल्या समोर आहे. त्यांच्या प्रेरणेने आपणाला जिल्हयात भक्कम पक्षबांधणी करायची आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालीका, नगरपंचायती तसेच विविध संस्थांच्या निवडणूका मजबुतीने लढून जिकायच्या आहेत. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नुतन अध्यक्ष श्रीशैल उडगे व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी यासाठी आतापासूनच तयारी करायची आहे. पक्षबांधणी करीत असतांना सदयाच्या कोरोना महामारीत जिल्हयातील जनतेच्या मदतीला धाऊन जाणारी त्यांच्या अडीअडचणी सोडवणारी फळी निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे म्हणाले की, वैद्यकीय प्रवेशासाठीचा प्रादेशिक पातळीवरील ७०-३०चा कोटा रद्द करून ना.अमित देशमुख यांनी मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण गेल्या वेळच्या भाजप सरकारला वेळोवेळी सांगूनही त्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी चा ७०-३०चा कोटा रद्द करता आला नाही. ना.देशमुख यांनी रेणापुर येथील चैत्यस्मारकाला दहा कोटींचा निधी दिला, तेच उद्याच्या महाराष्ट्राचे उगवते नेतृत्व आहेत.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ना.अमित देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा कायम आभारी आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीतही जिल्हा काँग्रेसने नागरिकांना अकरा हजार अन्नधान्य कीट, पोलीस, डॉक्टर आधी कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट, राज्यातील मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची व्यवस्था, रक्तदान आधी यासारखे लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. काँग्रेस पक्षाने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या कार्यकर्त्यांनी सोडवल्या पाहिजेत. येत्या डिसेंबर मधील चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचाच निश्चित विजय होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीचे प्रास्ताविक करतांना लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी दिलेल्या संधी बददल सर्व नेत्यांचे आभार मानले. लातूर शहरातील काँग्रेसचे वैभव कायम ठिकविण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न राहतील असेही त्यांनी म्हटले आहे. अध्यक्षपदी निवड झाले नंतर शहर काँग्रेसच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत असून केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्णया विरोधात अनेक आंदोलने केली आहेत. काँग्रस पक्षाचा कार्यकर्ता सक्रीय राहील यादृष्टीने नियोजन सुरू आहे असे त्यांनी सांगितले.ज्येष्ठ पदाधिकारी तसेच तालुका, शहरध्यक्षानी योवळी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीचे सुत्रसंचालन प्रा. सुधीर अनवले यांनी केले तर शेवटी आभार लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे यांनी मानले.
----------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.