माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावे--जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

 माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावे--जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर





            उस्मानाबाद,दि.15( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) :-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 15 सप्टेंबर पासून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्हयातील प्रत्येक गावात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती स्तरावर माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येणार आहे.

     ही मोहिम दोन टप्यात राबविण्यात  येणार आहे. राज्यात ग्रामीण भागात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा दि.15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत आणि दुसरा टप्पा  12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोंबर असा असणार आहे.

     यामध्ये कर्मचा-यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक गावातील घरांना भेटी देवून घरातील सर्व सदस्यांचे तापमान, SPO2 तपासणे,तसेच कोमॉर्बीड कंडीशन आहे का याची माहिती घेण्यात येणार आहे. यामध्ये ताप, खोकला, दम लागणे, SPO2 अशा कोविड सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तिींना जवळच्या फिव्हर क्लिनीकमध्ये   संदर्भित करण्यात येईल. फिव्हर क्लिनीकमध्ये कोविड-19 प्रयोगशाळा चाचणी करुन  पुढील उपचार करण्यात येतील.

     या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी आशा स्वयंसेविका आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने ही राज्यव्यापी मोठी मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हयातील शहर/गाव/वस्त्याम/तांडे यातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य तपासणी, को-मॉर्बीड  आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरीकास व्यक्तिशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.

या मोहिमे अंतर्गत गृहभेटीसाठी  येणाऱ्या पथकास सहकार्य करुन जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही,वडगावे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या