कृषी व अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत ७०-३० चा फॉर्म्युला रद्द करा - आ. अभिमन्यू पवार.
औसा -वैधकिय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिये प्रमाणेच कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयीन प्रवेशासाठी राज्यात लागू असलेला ७०-३० चा फॉर्म्युला रद्द करण्यात यावा अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे कृषीमंत्री व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे.
कृषी व अभियांत्रिकी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत ७०-३० चा फॉर्म्युला लागू असल्याने सदर महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विभाग निहाय असमान संधी मिळत आहेत.आपल्या राज्यात विभागनिहाय कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संख्येत असमानता असल्यामुळे ७०-३० चा फॉर्म्युला नुसार ज्या विभागात महाविद्यालयांची संख्या कमी आहे.त्या विभागातील विद्यार्थ्यांना कमी संधी प्राप्त होत आहे.स्वत च्या विभागाच्या बाहेरील एखाद्या नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विभागातील पात्र विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी अधिक गुण दुसर्या विभागातील विद्यार्थ्यांना मिळवावे लागत आहेत.प्रवेशाच्या संधीची असमानता दुर व्हावी ही मराठवाड्यातील विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे.
तरी वैधकिय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रमाणेच कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयीन प्रवेशासाठी राज्यात लागू असलेला ७०-३० चा फॉर्म्युला रद्द करण्यात यावा अशी विनंती पर मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.