*खरीप पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी*.
- *सामाजिक कार्यकर्ते रमेश लोंढे यांची पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी*
- लातुर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन खरिपाच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. यामुळे खरिपाचे संपूर्ण पीक हातातून गेलेले आहे. या झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रमेश लोंढे यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जी श्रीकांत यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच खरीपानं भरलेलं ताट, निसर्गाने सोयाबीनची तर लावली वाट. अशी विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी फिरवली नुकसान पाहणी दौऱ्याकडे पाठ, आणि कलेक्टरशी आहे आता शेतकऱ्यांची गाठ. ही स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचं झालेला आहे फार मोठे नुकसान, त्यांच्या शरीरातलेही गळून गेले अवसान. असा विचित्र प्रसंग बळीराजा पुढे निर्माण झाला आहे. मायबाप सरकारने सोयाबीनचे द्यावे अनुदान, नाही तर शेतकरी जातीच संपेल खानदान. एवढा वाईट प्रसंग शेतकऱ्यांच्या जीवना समोर उभा राहिलेला आहे असे प्रतिपादन या निवेदनात रमेश लोंढे यांनी मांडले आहे.
सततच्या पावसाने औसा तालुक्यातील सोयाबीन व इतर पिकांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. परिपक्व अवस्थेत असलेल्या सोयाबिनच्या हिरव्या शेंगाला उभ्याने मोडं फुटले आहेत. पूर्ण औसा तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने झालेल्या पावसाच्या नोंदीवरून अतिवृष्टीच झाली आहे.
संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांचा आणि निसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन झालेल्या या संपूर्ण नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाईचे अनुदान देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधी यांनी करावी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.