मुस्लिम समाजाच्या नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांच्या मुस्कया आवळा समाज बांधवांचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांना साकळे

 मुस्लिम समाजाच्या नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांच्या मुस्कया आवळा


समाज बांधवांचे

मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांना साकळे

 





वसमत (प्रतिनिधि)

होळ तालुका केज,जिल्हा बीड येथे मुस्लिम समाजातील नागरिकांवर विनाकारण प्राण घातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांच्या मुस्कया आवळुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वसमत येथील समाज बांधवांनी शुक्रवारी दुपारी उपविभागीय अधिकारी मार्फ़त मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याकड़े केली आहे


दिनांक १६ सप्टेंबर रोजी धारूर येथील तबलिग जमातचे अमीर (प्रमुख) काझी निजामुद्दीन व त्यांचे साथीदार अंबाजोगाई  येथे एका अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कार मध्ये तांत्रिक अडचणी झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबले होते. या वेळी काही अज्ञात समाजकंटकांनी  जातीवाचक व धार्मिक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

 या हल्ल्यात काझी निजामुद्दीन व सोहेल तांबोळी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे


पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाने हल्ला होणे खुप चिंताजनक बाब आहे. धर्माच्या आधारावर मारहाण करणे म्हणजे एका प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे. जिल्ह्यात व राज्यात कायदा व व्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनुषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटक गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर  गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी

निवेदनाद्वारे करण्यात आली आहे


निवेदनावर समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या