भूम
भूम तालुक्यात डूकरवाडी येथे मध्यरात्री वीज पडून एक रेडि व एक म्हैस ठार झाली. यात प्रशासकिय पंचनाम्यानुसार १ . लाख दहा हजाराचे नुकसान झाले प्रशासनाकडून भरपाई मिळावी अशी अपेक्षा श्रीकृष्ण नानासाहेब सोन्नर यांनी केली आहे .
गेले दोन दिवसापासून तालुक्यात संततधार पावसाची हजेरी चालू आहे, यामुळे तालुक्यातील जवळपास सर्व तलाव तुडूंब भरले आहेत. या पावसाचा कांहि पिकांना आधार तर कांहि काढणी मोडणी चालू असलेल्या पिकांना नुकसानीचा फटका बसत आहे .
यातच बुधवार दि १६ सप्टेंबर रोजी डूकरवाडी ता भूम येथिल श्रीकृष्ण नानासाहेब सोन्नर यांनी जनावरांची देखभाल चराई करुन जनावरे घराजवळ बांधली होती . या दिवशीही पाऊस चालु होता दरम्यान गुरुवार दि १७ सप्टेंबरचा दिवस उजडण्यापूर्वीच रात्री १ वाजणेचे दरम्यान पावसासह विजेचा मोठा कडकडाट झाला आणि कांहि कळण्याच्या आत घराजवळ बांधलेल्या जनावरावर विज पडली .
यामध्ये श्रीकृष्ण सोन्नर यांचे २ मोठी जनावरे जागीच ठार झाली घटनास्थळी संबधित तलाठी यांनी भेट देवून पाहणी करून पंचनामा केला यावेळी पोलिस पाटिल रामदास पाटिल व गावातील नागरिक पंच उपस्थित होते
सदर पंचनामा अहवालात रेडि किंमत ५५००० तर म्हैस किंमत ६०००० एकून ११०००० रुपयाची नुकसान नमुद केली . सदर पंचनामा नुसार नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी श्रीकृष्ण सोन्नर यांनी शासनाकडे केली आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.