लातूरच्या काँक्रीट रोडची कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे -- अमित देशमुख
मुंबई दि. 9:
राष्ट्रीय महामार्ग लातूर अंतर्गत येणाऱ्या काँक्रीट रोडची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथील प्रगती पथावरील असलेली काँक्रीट रोडची कामे व सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार धीरज देशमुख, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की,राष्ट्रीय महामार्गांची कामे पूर्ण करताना ग्रामीण भागातील रस्त्यांची कामेही वेळेत पूर्ण करण्यात यावीत. मराठवाड्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या रस्त्त्यांची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. अंबाजोगाई ते रेणापूर फाटा (पळशी ते रेणापूर फाटा), लातूर ते पानंगाव आणि औसा ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरु आहे.याशिवाय जुने राष्ट्रीय महामार्ग आणि नवीन राष्ट्रीय महामार्गाची कामे सुध्दा सुरु असून या सर्व कामाला प्राधान्य देण्यात यावे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.