कातपूर-हिप्परसोगा-हासेगाव रस्ता व रस्त्यावरील तावरजा पूलाची पाहणी केली तसेच सोयाबीन उडीद व मूग या पीकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला!
दुर्दशा झालेल्या कातपूर-हिप्परसोगा-हासेगाव रस्त्याची व रस्त्यावरील तावरजा पूलाची आज ग्रामस्थांसह पाहणी केली. सदरील पूलाची उंची वाढविण्याची आवश्यकता असून रस्त्याचीही तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबींसाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सुचना दिल्या.
हिप्परसोगा येथील शेतकरी बांधवांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या सोयाबीन, उडीद व मूगाची पाहणी केली. प्रत्येक गावाची, शिवाराची एकच कैफियत आहे; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शेतकरी बांधवांना दिली.
यावेळी सोबत औसा भाजप तालुकाध्यक्ष श्री सुभाष जाधव, श्री हेमंत पाटील, श्री अमर पाटील, श्री श्रीराम माने, शेतकरी श्री उद्धव पाटील, श्री माधवराव पाटील, श्री संजय पाटील, श्री सचिन पाटील, श्री सुहास पाटील, श्री मारोती चेवले, श्री अमोल सोमवंशी, श्री शिवराज कोरे, महसूल मंडळ अधिकारी श्री मिरजगावकर, तलाठी श्री बालाजी जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.