किल्लारी व मारुती महाराज दोन्ही साखर कारखाने सुरू करा - आ. अभिमन्यू पवार.
उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे केली मागणी.
औसा - औसा विधानसभा मतदारसंघातील वाढते ऊसाचे क्षेत्र व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप होण्याच्या दृष्टीने मतदारसंघातील सध्या बंद असलेला किल्लारी व बेलकुंड येथील साखर कारखाना सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हि अडचण सोडविण्यासाठी या दोन्ही साखर साखर कारखान्यांना विशेष बाब म्हणून थकित कर्जास व पुर्व हंगामी कर्जास शासनाने थकहमी देवून दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यात यावेत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री अमित देशमुख यांची मुंबई येथे आ.अभिमन्यू पवार यांनी भेट घेवून मतदारसंघातील ऊसाचे वाढलेले क्षेत्र,बंद असलेले साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण दुर होण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना याबाबत सखोल चर्चा केली.औसा विधानसभा मतदारसंघात तेरणा व तावरजा या दोन नद्या असून या दोन्ही नद्यांवर मध्यम प्रकल्प व बॅरेज आहेत यंदा मुबलक पाऊस झाल्याने सदर मध्यम प्रकल्पासह साठवण तलाव व अन्य जलस्रोत पाण्याने भरली आहेत गतवर्षी परतीचा मुबलक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी संत मारुती महाराज व किल्लारी सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या ऊसाची लागवड केली असून औसा मतदारसंघात ५ लक्ष मेट्रीक टनापेक्षा अधिक ऊस उपलब्ध असून यावर्षीच्या मुबलक पावसामुळे हेक्टरी उत्पादनात भरघोस वाढ दिसत आहे सर्वत्र पावसाच्या पाण्याचा साठा वाढल्याने ऊसाची नवीन लागवड मोठ्या होत आहे. आणि पावसाळ्यानंतर ऊसाचे लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना व किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने मागील दुष्काळी परिस्थिती पाण्या अभावी बंद असून यामुळे हे दोन्ही साखर कारखाने बॅंकेच्या थकित कर्जामुळे बॅंकेच्या ताब्यात आहेत.एंकदरीत या दोन्ही साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता व वेळेवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास गाळप होण्याच्या दृष्टीने हे दोन्ही साखर कारखाने सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.या दोन्ही साखर कारखान्यांना विशेष बाब म्हणून थकित कर्जास व पुर्व हंगामी कर्जास शासनाने थकहमी देवून दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यात यावेत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
या चर्चेत दोन्ही नेत्यांसोबत आपली सकारात्मक चर्चा झाली असून औसा विधानसभा मतदारसंघातील ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी हे दोन्ही साखर कारखाने सुरू करणे आवश्यक असल्याची बाब या चर्चेत लक्षात आणून दिल्याची माहिती यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.