राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मृत्यु प्रकरणाची CBI/उच्चस्तरीय चौकशी करावी -- बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच लोहारा तालुका
उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी तौफीक कुरेशी )
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मृत्यु प्रकरणाची CBI/उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, आशा मागणीचे निवेदन बसव ब्रिगेड अखिल भारतीय युवा मंच लोहारा तालुका यांच्यावतीने तहसीलदार विजय अवधाने यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारे गुरुतुल्य लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची वयाच्या १०४ वर्षी दि.१ सप्टेंबर रोजी प्राणज्योत मालवली. दि.१६ ऑगस्ट रोजी भक्ती स्थळ ट्रस्ट बाबतीत काही जुन्या सदस्यांचे राजीनामे डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी मागितल्यामुळे ट्रस्टीने गोंधळ घातला होता. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मर्जी विरोधात ट्रस्टच्या विस्ताराच्या नावाखाली जुन्या ट्रस्टीच्या मर्जीतीलच नवीन सदस्यांची/पदाधिका-यांची निवड त्यांच्या जुन्या कामाचा हवाला देऊन करण्यात आली. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांवर भावनिक दडपण आणून चेंज रिपोर्ट वर सह्या घेतल्याचे ऐकण्यात आले होते. तरी याबाबत उच्चस्थरिय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच तालुकाध्यक्ष वीरभद्र पावडे, उपाध्यक्ष महेश पाटील, शंकर अण्णा जट्टे, बसवराज पाटील, बाळासाहेब कोरे, सुधाकर पाटील, शिवराज लद्दे, गगन माळवदकर, मल्लिनाथ फावडे, बाळु माशाळकर, गणेश कमलापुरे, रामेश्वर कार्ले, विक्रांत संगशेट्टी, सचिन माळी, सोमनाथ कुर्ले, अमोल फरीदाबादकर, काशिनाथ पाटील, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.