औसेकरांच्या वतीने हाथरस येथे घटनेचा निषेध व पीडितेस भावपूर्ण श्रद्धांजली
औसा मुख्तार मणियार
औसा येथे हाथरस येथे घटनेचा निषेध व्यक्त करुन पीडितास औसेकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
- उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या १९ वर्षीय पीडितेनं दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.१४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते.आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती,तसेच पाठीचा कणाही मोडला होता.रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती.शुद्धीवर आल्यानंतर तिनं न बोलताच आपल्यावर झालेले सगळे अत्याचार इशाऱ्यांतूनच व्यक्त केले.तिच्या अंगावरच्या जखमाच सगळं काही सांगत होत्या.गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती.रामराज्य असलेल्या उत्तरेत रामायण लिहीणाऱ्या वाल्मिकी ऋषींच्या वंशजाला पाशवी अत्याचाराला बळी पडावे लागले. या घटनेचा निषेध म्हणून औसा शहरात आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजता श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच वेगवेगळ्या पक्षांचे नेते मंडळी उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये
यासाठी कडक कायदे करावे अशी मागणी यावेळी उपस्थित महिला मंडळी यांनी केले.समाजानेही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अशा प्रकारचे विचार या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला मंडळांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.