वन्यजीवांचे संवर्धन करणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य - सर्पमित्र अभिजित गायकवाड
उस्मानाबाद ( प्रतिनिधी तौफिक कुरेशी )
वन्यजीवांचे संवर्धन करणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ऑर्गनायझेशन ऑफ बायोडाव्हर्सिटी कन्झरवेशन चे सचिव सर्पमित्र अभिजित गायकवाड यांनी केले. (लोहारा) वन परिक्षेत्र कार्यालय उमरगा व ऑर्गनायझेशन ऑफ बायोडाव्हर्सिटी कन्झरवेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तहासिल कार्यालाय लोहारा येथे तहसीलदार विजय अवधाने यांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीवजीव सप्ताह निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी अभिजित गायकवाड यांनी प्रोजेक्टर च्या माध्यमातून सापांसह विविध प्राण्यांविषयी सखोल माहिती दिली, मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी विविध उपायजोजना, प्राण्यांचे अन्नसाखळीतील महत्व व वन्यजीवांचे मानवाच्या जीवनातील महत्व अधोरेखित केले. यावेळी वन विभागाच्या वतीने तहसीलदार विजय अवधाने यांच्या हस्ते सर्पमित्र अभिजीत गायकवाड व सर्पमित्र तथा नगरसेवक श्रीनिवास माळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार आर.आर.शिराळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक कठारे, वन परिमंडळ अधिकारी डी.ए.माळी, वनरक्षण जी. एल.दांडगे, सर्पमित्र तथा नगरसेवक श्रीनिवास माळी, तहसील कार्यालयातील सर्व विभागप्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक श्रीमती.के.यु.साबदे, एम.एम. चिकुन्द्रे, के.बी.राठोड यांनी प्रयत्न केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.