महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील गोमातासह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.* *सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांची आयुक्त देविदास टेंकाळे यांचेकडे मागणी*.

 *महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील गोमातासह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.* 

 

*सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांची आयुक्त देविदास टेंकाळे यांचेकडे मागणी*.   









लातुर :  ७ - ( प्रतिनिधी ) महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मोकाट जनावरांचा वाढता त्रास बघता कडक उपाय योजना करण्याची आवश्यकता आसुन मोकाट जनावरांमुळे नागरीकांना त्रास होऊ नये या दृष्टीने काय करता येईल याचा विचार महानगरपालिका प्रशासनाने आणि महापौर, उपमहापौर तसेच लोकप्रतिनिधीनी करून तात्काळ कार्यवाही व अंमलबजावणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त  देविदास टेंकाळे यांच्याकडे केली आहे. मोकाटपणे रस्त्यावर फिरत असणाऱ्या जनावरामुळे रस्त्यावर होणारे अपघातापासून जनतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे. बऱ्याच दिवसापासून शहरामध्ये  मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. याबाबत बऱ्याच नागरिकांनी लोकाधिकार न्यूजचे संपादक व्यंकटराव पनाळे यांच्या कडे तक्रारी केल्या आहेत.  वाहनचालकांना आणि पायी प्रवास करताना जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  

छत्रपती श्री शिवाजी महाराज  चौकातील भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला गोमाते सह अनेक मोकाट जनावरे भर रस्त्यावर उभी असतात. शहरातील महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, सुभाष चौक, गंजगोलाई, राजीव गांधी चौक, यासह सर्वच मुख्य चौकात आणि अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर हि जनावरे थांबलेली व बसलेली असतात. याशिवाय मोकाट कुत्रे नागरीकांना, लहान मुलांना चावा घेण्यासाठी त्यांच्या मागे, तसेच वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चावा घेतल्यास रेबीज सारख्या घातक रोगाची सुद्धा लागन होऊ शकते. मोकाट जनावरांची भीती वाटावी असे वातावरण तयार होऊ नये या दृष्टीने त्यांचा बंदोबस्त महानगर पालिकेच्या प्रशासनाने करणे अत्यंत जरुरीचे आहे. 

महानगरपालिके मार्फत शहरातील मोकाट असलेली जनावरे ठेवता येथील एवढी मोठी क्षमता असलेला कोंडवाडा निर्माण करावा लागेल. तसेच हि पकडलेली जनावरे ठराविक मुदतीत ज्यांची आहेत त्यांनी घेवून नाही गेल्यास महानगरपालिकेने नियमानुसार लिलावाची कायदेशीर कार्यवाही करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा ही शहराची आजची गरज आहे. 

या कोरोना महामारीच्या परिस्थितीत जर मोकाट जनावरांपासून होणारे संसर्गजन्य रोग पसरले तर नवीन आजाराला तोंड देणे कठीण होईल असा प्रश्न  आयुक्ताकडे व्यंकटराव पनाळे यांनी मांडला आहे. त्यामुळे जनावरांसह कुत्रे व वराह हे प्राणी मोकाट फिरताना आढळल्यास व नागरिकांना याचा त्रास झाल्यास यास महानगरपालिका प्रशासनास जबाबदार धरले जाईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या