अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने "बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा" लाभ घ्यावा: सौदागर
लातूर(प्रतिनिधी ) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय मान्यताप्राप्त मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन द्वारे अल्पसंख्यांक समाजातील मुलींना "बेगम हजरत महल शिष्यवृत्ती" साठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असा आव्हान मुजीब सौदागर यांनी केला आहे.
मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून बेगम हजरत महल शिष्यवृत्ती दिली जाते. इ. ९ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतगर्त ९ वी व १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक ५००० रुपये तसेच इ. ११ वी व १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ६००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख "३१ ऑक्टोबर २०२०" आहे. अर्ज दाखल करण्यासाठी http://bhmnsmaef.org/maefwebsite/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळेच्या मुख्याधिपकांशी संपर्क साधा. अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असा आव्हान मुजीब सौदागर यांनी केला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.