जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा


जिल्हाधिकारी कार्यालयात 

अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा






लातूर,दि.18,(जिमाका):-जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला. या अल्पसंख्यांक हक्क दिवस कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश महाडिक, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. दुशिंग, सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी उपस्थित होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी जिल्हयात अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची कामे संबंधित अधिकारी वर्गाने ताबडतोबीने पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करुन मार्गदर्शन केले. प्रारंभी सहायक निवडणूक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी प्रस्ताविकात जिल्हा अल्प संख्यांक विषयी राबवित येत असलेल्या योजनाची माहिती पीपीटीव्दारे विषद केली.यावेळी अल्पसंख्यांकचे प्रतिनिधी म्हणून जाफर कादरी यांचा निवासी उपजिल्हाधिकारी ढगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी श्री.दुशिंग यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.


क्यों होती है रफ़्तार धीमी जब अल्पसंख्यक के विकास की बात होती है 👇





                                                    ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या