शहरातील एक नामवंत डॉक्टरास महिलेशी गैरवर्तन करताना मारहाण...
औसा प्रतिनिधी /-औसा शहरातील एक नामवंत खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांने पेशंट सोबत अश्लील गैरवर्तन केल्याप्रकरणी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, औसा शहरातील एक खाजगी नामवंत डॉक्टर आपल्या दवाखान्यात महिला पेशंट सोबत तपासणी च्या नावाखाली अश्लील गैरवर्तन केल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली. शहरातील काही खाजगी दवाखान्यात असे प्रकार होत आल्याने जनतेत तीव्र रोष संताप व्यक्त केला जात आहे. " रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा " ब्रीद वाक्याला शहरातील डॉक्टरांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्येचा फायदा घेत शहरातील काही डॉक्टर्स हे रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. आजार एक, तर औषध दुसरे, थोडासा आजारासाठी भरमसाठ औषधांचे बिल देऊन रुग्णांची लुबाडणूक करत आहेत. शहरातील अशा गोरख धंद्यांना आळा घालणे आवश्यक आहे. शहरातील लिंगपिसाट डॉक्टराविरुद्ध कारवाई म्हणून एका संघटनेने औशाच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे. अशा हरामखोर डॉक्टरविरुद्ध कारवाई व्हावी व महिला रुग्णासोबत अश्लील गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी व बोगस दवाखाने बंद करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन औसा तहसीलदारांना संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.