म्हेञे जिएस महात्मा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

 म्हेञे जिएस महात्मा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानीत




                    औसा(प्रतिनिधी)दि.१७  दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी शब्दगंध प्रकाशन औरंगाबाद यांच्या वतीने जि प प्रा शा चिचोंडी येथील प्राथमिक पदवीधर श्री म्हेत्रे  जी एस यांना महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मौलाना आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला याप्रसंगी त्यांचा गुणगौरव करण्यासाठी  तेलंग केंद्रप्रमुख होसुर,  अंकुशे एम एस संचालक शि. पत.सं. उदगीर , तुगावे पी आर तंत्रस्नेही शिक्षक चिचोंडी,  भोईटे, तंत्रस्नेही शिक्षक चिचोंडी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात शाळा व नवोदितांच्या कविता या दोन काव्यसंग्रहात त्यांच्या कविता छापून आल्या आहेत. सदरील पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा याप्रसंगी करण्यात आले या कार्यक्रमाला शब्दगंध प्रकाशनाचे संपादक संदीप त्रिभुवन ,औरंगाबाद येथील  संपादक वाघमारे , वृत्तपत्र संपादक  काळे  व  साहित्यिक उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एका शिक्षकांचा त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला याकरिता होसुर केंद्रातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.                     ===========

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या