औसा शासकीय कार्यालयाला अल्पसंख्यांक हक्क दिनाचा विसऱ

 काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व भाजप मध्ये अल्पसंख्यक पदे  आहेत मात्र त्यांना अल्पसंख्यांक हक दीवस काय आहे   त्यांनाच माहीत नाही? फक्त नावालाच अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष अल्पसंख्यांक सेल म्हणून समाजामध्ये फिरत आहेत पण त्यांनाच माहित नाही की अल्पसंख्याक दिवस का आहे  कोना साठी आहे पंधरा कलमी  कोणाला म्हणतात अल्पसंख्याक साठी काय योजना आहेत मग सामान्य जनतेला त्याची माहिती कशी असेल

औसा   शासकीय कार्यालयाला अल्पसंख्यांक हक्क दिनाचा 

विसऱ 






औसा प्रतिनिधी/-तालुक्यासह शहरातील शासकीय कार्यालयात अल्पसंख्यांक दिनाचा विसर झाल्याने शहरातील अल्पसंख्यांक समाजातर्फे  निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनाचा सर्व शासकीय कार्यालयांना विसर पडला असून अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कासाठी व विविध योजनांसाठी या दिवशी माहिती देणे गरजेचे होते पण, शहरातील शासकीय कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा केला गेलच नाही .नगरपालिका प्रशासनात ने फक्त कर्मचाऱ्यांनाच सोबत घेऊन अल्पसंख्यांक दिनाची थट्टा केली गेली. शहरातील अल्पसंख्यांक समाजातील तसेच  सामाजिक  जनतेला अल्पसंख्यांक समाजाच्या योजना व माहिती देण्यासाठी निमंत्रणास बोलावलेच नाही.? तसेच औसा  तहसीलदारांना एम आय एम तर्फे निवेदन देऊन सुद्धा त्यांनी 18 डिसेंबर ही अल्पसंख्याक दिवस साजरा केला नाही

 मागील अनेक वर्षापासून अल्पसंख्यांक हक्क दिनाविषयी शासनास वारंवार निवेदने सादर करूनही अल्पसंख्यांक दिनाची शासकीय कार्यालयात अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने एक प्रकारची अल्पसंख्यांक ची थट्टाच झाली आहे, असे  मत औसा एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या