*लबाड व भ्रष्ट शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांची पुणे येथे बदली*
लातूरला शिक्षण उपसंचालक म्हणून येण्याचे मनसुबे उधळले !!!
*(व्यंकटराव पनाळे जिल्हा प्रतिनिधी)*
लातुर : दि. १७ - लातूर जिल्हा परिषदेतील लबाड व भ्रष्ट अशी कारकीर्द राहिलेले माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर संपतराव उकिरडे यांची अखेर तात्पुरत्या पदोन्नतीवर पुणे येथे शिक्षण उपसंचालक म्हणून बदली झाली आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर संपतराव उकिरडे हे लातूर येथेच शिक्षण उपसंचालक म्हणून येण्यासाठी आटोकाट व *अर्थ* पूर्ण प्रयत्न करत होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये लातूर येथेच शिक्षण उपसंचालक म्हणून यायचे असे ठरवून उकिरडे यानी सर्वार्थाने पूर्ण तयारी केली होती. परंतु त्यांची डागाळलेली प्रतिमा आणि उदगीर येथील शामार्य कन्या विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते पंडित यांचे शालेय पोषण आहार चोरी प्रकरण दडपण्यासाठी गुपचूप मदत करणे औदुंबर उकिरडे यांना महागात पडले. व अखेर उकिरडे यांची लातूर जिल्हा परिषदेतून बदली झाली आणि शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांना पुणे येथे तात्पुरती पदोन्नती मिळाली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.