बुधोडा जि प शाळेत 12 उपक्रम साजरा.
औसा प्रतिनिधी /- दि.१६/१२/२०२० रोजी ,जि.प.प्रा.शाळा, बुधोडा येथे शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बाला उपक्रम विषयावर अनुपमा भंडारी गटशिक्षणाधिकारी पं. स. औसा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.
शाळेचे मुख्याध्यापक घंटे युवराज यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रेरणादायी प्रस्तावना केली.
नंतर ज्यांच्या पंखात आत्मविश्वासाचे बळ आहे आणि ते बळ घेवून औसा/ रेणापूर तालुक्याची धुरा खंबीरपणे सांभाळत आहेत,अशा आमच्या प्रेरणास्थान असणाऱ्या अनुपमा भंडारी यांनी सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या मनोगतात त्यांनी बाला प्रकल्पातील विविध उपक्रम आणि या उपक्रमाने शाळा/मुले यांचा गुणवत्तेसाठी कालापालट होईल, आणि लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाला गती मिळेल हे सांगितले.
त्यासाठी या उपक्रमा अंतर्गत शाळांच्या भिंती, दरवाजे,खिडक्या, फर्निचर यावर चित्रे; गणिताची सूत्रे, नकाशे आदी रंगविता येतील आणि खेळता खेळता मुलांना शिक्षण व स्वंयशिस्त लागेल,याचा त्यांच्या गुणवत्ता वाढीस आणि शिक्षणाच्या गोडीस नक्कीच मदत होणार आहे. मात्र यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमावर भर, शाळेची रंगरंगोटी आणि शाळेच्या इमारतीचा प्रत्येक भाग शैक्षणिक साहित्य म्हणून कसा उपयोगात आणू शकतो हे स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी सर्वश्री गणेश कोलपाक, कापसे,
बोयणे, निवृत्ती अलगुले, मगर गोपीनाथ, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भारत कांबळे यांनी केले तर आभार वृषाली साबदे यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.