अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत खात्यावर जमा करा: आकाश प्रकाश पाटील यांची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत खात्यावर जमा करावी अशी मागणी दि.१४ डिसेंबर २०२० सोमवार रोजी एका निवेदनाद्वारे औसा तहसीलदार यांना मराठा शिवसेवक समिती औसा तालुका समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनात राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय विडेटिवार व पालकमंत्री अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत करु असे सांगितले होते.परंतूऔसा तालुक्यातील ५४ गांवानाच आल्याशी मदत (अर्धवट) मिळाली आहे.तरी तो संपूर्ण व उर्वरित सर्व गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ अनुदान जमा करावी.२१ डिसेंबर २०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर तिवर आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल असा इशारा मराठा शिवसेवक समितीचे औसा तालुका अध्यक्ष आकाश प्रकाश पाटील यांनी निवेदनाद्वारे औसा तहसीलदार यांना मागणी केली आहे.या निवेदनावर मराठा शिवसेवक समितीचे औसा तालुका अध्यक्ष आकाश प्रकाश पाटील व उत्के श्री सतिष यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.