औसा तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीसाठी अधिसूचना जारी
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील एकूण 46 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून आवश्यक तेथे 15 जानेवारी 2021 रोजी मतदान घेण्यात येणार असून औसा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असल्याने अवसा शहरासह ग्रामीण भागातील आचार संहिता लागू करण्यात आली, अशी माहिती औसा तहसीलदार शोभा पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिनांक 14 डिसेंबर 2020 सोमवार रोजी दिली. तालुक्यातील मुद्दत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या 46 ग्रामपंचायतीसाठी आज अधिसूचना जारी झाली आहे. नामनिर्देशन पत्र घेणं व सादर करण्यासाठी 23 ते 30 डिसेंबर 2020 पर्यंत सुट्टी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. दिनांक 31 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी सकाळी 11 वाजता सुरू होईल. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी 4 जानेवारी 2021 असून त्यादिवशी 3 वाजे नंतर चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीसाठी आवश्यकता भासल्यास दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7-30 वाजता ते सायंकाळी 5-30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान घेण्यात येईल दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार शोभा पुजारी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी निवडणूक विभागातील नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर, महसूल विभागातील नायब तहसीलदार शिवाजी कदम, वृषाली केसरकर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.