प्रविण शिवनगीकर यांना कै.रामनाथजी भराडिया आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान
लातूर
येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे कुलसचिव प्रविण रंगनाथ शिवनगीकर यांना श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थे च्यावतीने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा कै.रामनाथजी भराडिया आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या ८१ वा वर्धापन दिन ७ जानेवारी रोजी राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून, शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांच्या शुभहस्ते प्रविण शिवनगीकर यांना कै. रामनाथजी भराडिया आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात
आला. याप्रसंगी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव ॲड आशिष बाजपाई, चेअरमन आनंद लाहोटी, प्राचार्य एस ए वरदन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रविण शिवनगीकर यांनी कार्यालयीन कुशल व्यवस्थापन आणि अद्ययावतीकरण यात विशेष योगदान देऊन त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्राचार्य कर्नल एस ए वरदन, कॅप्टन बीके भालेराव, विद्या साळवे, विक्रम माने, जयंता भांगडीया, देवयानी देशपांडे, विनोद चव्हाण, प्रविण सावरगावकर,
सरिता खंडेलवाल, सतीश जाधव, अमित होणमाळे, शैलेंद्र डावळे, सुनील मुनाळे, प्रकाश जकोटीया, आशीद बनसोडे, मिलिंद शेटे, विवेक डोंगरे, ज्ञानेश्वर यादव आदीसह शिक्षक व कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.