रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे उत्कृष्ट व्यवसाय-सेवा पुरस्कार जाहीर
रविवारी होणार वितरण
लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट व्यवसाय- सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.रविवारी (२४जानेवारी) मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
दर वर्षी आपापल्या व्यवसायात व सेवाक्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने उत्कृष्ठ व्यवसाय -सेवा पुरस्कार देवून सन्मान केला जातो.अशा पुरस्कारांमुळे अशा प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळाते.त्यांच्या कामापासून समाजातील ईतर व्यक्तींनी प्रेरणा घ्यावी,यासाठी अनेक वर्षांपासून असे पुरस्कार दिले जातात.या वर्षीही रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनने लातूरमधील मान्यवर व्यक्तींची माहिती घेवून त्यात ठराविक निकष लावून सहा व्यक्तींची निवड केली आहे.
यावर्षी कोविड काळातील कार्यासाठी डॉ. विजय वीरशेट्टी चिंचोळकर,उद्योजकता क्षेत्रातून जगदीश दत्तात्रय कुलकर्णी,
व्यापार क्षेत्रातून वर्मा झेरॉक्स,
महिला उद्योजकातून सौ. मंगल बोधे,सेवा व्यवसायातून (Service industry) दामोदर ओमप्रकाश मुंदडा व
लघु उद्योजकातून अमोल राजकिरण ठाकूर यांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
लातूरसह मराठवाड्यातील ज्येष्ठ उद्योजक बी.बी.ठोंबरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.रोटरीच्या सहाय्यक प्रांतपाल डॉ. सौ. मायाताई कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.रविवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज,कव्हा रोड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष अनुप देवणीकर,सचिव रवींद्र पुंडीफल्ले,व्होकेशनल डायरेक्टर संतोष हत्ते,प्रोजेक्ट चेअरमन चंद्रप्रभु जंगमे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.