औसा नगर परिषद येथे विषय समितीचे सभापती पदाची निवड केली
औसा मुखतार मणियार
औसा नगर परिषद येथे दिनांक 20 जानेवारी 2021 बुधवार रोजी ठिक दुपारी 12:30 वा, पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,औसा -
रेणापूर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तसेच आजच्या विशेष सभेस एकूण (21 )सदस्य उपस्थित होते.सकाळी 10.00 ते 10.30 या वेळेत मुख्याधिकारी यांच्या कड़े नामनिर्देशन पत्र 5 दाखल करण्यात आले होते,त्यानंतर शिक्षण क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती वगळता उर्वरित विषय समित्यांचे सभापती पदाकरिता पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली. उपरोक्त निर्धारीत वेळेत विषय समिती सभापतीसाठी पुढीलप्रमाणे प्रत्येकी एक-एक नामनिर्देशन पत्र दाखल झालेली आहेत.
तसेच दुपारी 12.30 वाजता प्राप्त नामनिर्देशनपत्रे पत्राची छानणी करण्यात आली (5) नामनिर्देशनपत्रे वैध असल्याचे पिठासीन अधिकारी यांनी घोषीत केले. त्यानंतर विषय समिती सभापती पदी खालील सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे
पिठासीन अधिकारी यांनी पोषीत केले खालीलप्रमाणे सभापतीची निवड घोषीत केली,
1 किती आशोक कांबळे सार्वजनिक बांधकाम समिती सभापती,2. मेहराज जलील शेख स्वच्छता, वैदयक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती,
3. गोविंद विठ्ठलराव जाधव पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती, 4 उन्मेश गुरूलिंगप्पा वागदरे नियोजन आणि विकास समिती सभापती, 5 माळी लक्ष्मीबाई व्यंकट महिला बालकल्याण समिती सभापती,6 कुरेशी अलिशेर मुसामिया शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती या सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी यांनी घोषित केले.
या विशेष सभेस नगराध्यक्ष डॉ .अफसर शेख, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, नगरसेवक जावेद शेख, मेहराज शेख, भरत सूर्यवंशी, अजहर कुरेशी,मुजाहेद शेख, परवीन नवाबोद्दीन शेख, गोविंद जाधव, रुमा साजिद अली काझी, जॅहाआरा तत्तापुरे, नजमुनबी इनामदार, कीर्ती अशोक कांबळे, अंगद कांबळे, मंजुषा हजारे, सुनील उटगे, उन्मेश वागदरे, लक्ष्मीबाई माळी, गोपाळ धानुरे, शिल्पा कुलकर्णी, रुपेश प्रकाश दुधनकर, सुहास डेंग या सर्व सदस्यांची व पक्ष/ गट नेत्यांनी शांततापूर्ण वातावरणात सहकार्य केल्याबद्दल पीठासन अधिकारी यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले निर्वाचित सभापती यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.