मार्च 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण लाईट बिल माफ करावे व वसुली थांबवावी आणि लाईट कट करू नये ; एम आय एम ची मागणी
औसा मुखतार मणियार
औसा आज दि.२१ जानेवारी २०२१ गुरुवार रोजी एम आय एम पक्षाच्या वतीने मार्च 2020 ते 2020 पर्यंत संपूर्ण लाईट बिल माफ करावे व वसुली थांबवावी करू नये या मागणीसाठी औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात महाराष्ट्र राज्यामध्ये covid-19 या महामारी मुळे व महाराष्ट्र राज्यामध्ये मार्च 2020 कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यस्तरावर व राष्ट्रीय पातळीवर लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हे लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्षात कामकाज व उद्योग धंदे वेगवेगळ्या स्थानिक संस्था धार्मिक स्थळावर बंदी ठेवण्यात आली होती. या काळात महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे काम धंदे, व्यापार-उद्योग, रोजगार, विशेषता मध्यमवर्गीय झालेले होते. हाताला रोजगार नसल्याने आपल्या परिवाराचा गाडा चालविण्याचा सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे गोर गरीब जनता परेशान असून महाराष्ट्र राज्यातील जनतेस हा प्रश्न भेडसावत आहे. सर्व आर्थिक व्यवहार घेवान देवान बंद असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गोरगरीब सर्वसामान्य जनता घरगुती वापरातील लाईट बिल सरकारने पूर्ण माफ करावे, याकरिता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेस मदत करण्यासाठी -19 या नैसर्गिक महामारीच्या काळात मार्च 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत महाराष्ट्र सरकारने वीज पुरवठा विभागाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेचे लाईट बिल माफ करावे व लाईट बिलावर लावण्यात आलेले अतिरिक्त सर्व कर माफ करण्यात यावे व तसेच लाईट कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही सध्या चालू असून सदरची कारवाई त्वरित थांबवण्यात यावी. यापूर्वी सदर बाबतीत अनेक वेळा मागणी करूनही आमची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. तरीही मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी अन्यथा एम आय एम पक्षाच्यावतीने संविधानिक मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार व एम आय एम नेते अॅड गफुरूल्ला हाश्मी यांनी केले आहे.यावेळी एम आय एम चे ईलहाज पटेल,अजिज पटेल,सय्यद फजले रहीम,सतीश गायकवाड, शेख आफताब,अक्षय बनसोडे,शेख नाजम,बापू होळीकर आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.