गाडी चालवितांना आपल्या परिवाराचा विचार करावा” *-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.*

 


 “गाडी चालवितांना आपल्या परिवाराचा विचार करावा”

                                                         *-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.*









*32 वे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

*विद्यार्थ्यांच्या मदतीने अभियान राबवावा

*कोरोनाशी झुंज देतांना ज्याप्रमाणे मास्क घालतात त्याच प्रमाणे हेल्मेटही घालावा

* Good samiritoun Kit प्रत्येक वाहन धारकाने बाळगावी

*ब्लॅक स्पॉट शोधून त्याठिकाणी सुधारणा करावी


लातूर,दि.19(जिमाका):-आपल्या देशात दरवर्षी 1 लाख 50 हजार लोक अपघातांमुळे मृत्यूमुखी जातात. या अपघातांवर आळा घालण्यासाठी यावर्षी 32 वे रस्ता सुरक्षा अभियान पूर्ण एक महिना म्हणजे 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार असून अपघातांचा प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना या अभियानात सामील करुन त्यांना व त्यांच्या पालकांना रस्ते सुरक्षेसंबंधी जनजागृती निर्माण करावी तसेच चालकांनी गाडी चालवितांना आपल्या परिवाराचा विचार करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी  केले. जिल्हाधिकारी  कार्यालयातील डी.पी.डी.सी. सभागृहात 32 वे रस्ता सुरक्षा अभियान- 2021 च्या  निमित्ताने आयोजित  कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  लातूर महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक एस.बी. क्षीरसागर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील,शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण अधिकारी माध्यमिक आदी उपस्थित होते. 

        जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनामुळे देशभरात 1 लाख 53 हजार नागरिकांनी आपले जीव गमावले. आणि कोरोना या महामारीपासून स्वत:ला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी शासन आणि आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन केले. फेस मास्क, सॅनेटायझर, सोशल डिस्टंसिंग इत्यादी सूचनांचे बऱ्यापैकी पालन केले.परंतु दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. तरी लोक परिवहन सुरक्षा मानकांचे पालन करतांना दिसत नाही. त्यामुळे चालकांनी हेल्मेट आणि सीटबेल्टचा नेहमी वापर करावा तसेच मी येथे उपस्थित प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना सूचित करु इच्छितो की 9 वी ते 12 वी कक्षांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अधिकाऱ्यांमार्फत रस्ता सुरक्षा विषयक व्याख्याने, व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे आयोजित करावीत व त्याव्दारे विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये रस्ता सुरक्षे बाबत जनजागृती निर्माण करावी. तालुकास्तरापर्यंत  सर्व माध्यमिक शाळा व कॉलेजमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे.

    जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी सहजपणे दिसू शकतील अशा प्रकारे बॅनर्स प्रदर्शित करावीत. वाहन चालकांना मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व वाहन चालविण्याची माहिती दयावी. महामार्गावरुन जाणाऱ्या परिवहन, वाहने, बैलगाडी, ट्रॅक्टर व ट्रॉली यांना परावर्तिका लावणे तसेच जिल्हा आरोग्य  विभागाच्या मदतीने ट्रक,बस, टॅक्सी व ऑटोरिक्षा अशा असंघटित चालकांसाठी नेत्रतपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीरांचे आयेाजन करावे असे सांगून जिल्हाधिकारी पृथ्वीराज  म्हणाले की, प्रत्येक चालकाने वाहन चालवतांना आपल्या परिवाराचा विचार करावा आणि आपल्या वाहनात त्यांचे फोटो ठेवावे जेणेकरुन त्यांना पाहून आपल्याला घरी जायचे आहे या हिशोबाने वाहने चालविले जातील. या अभियानांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हयातील अपघाती क्षेत्रांचे व्यवस्थित नियोजन करणे अपेक्षित आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचा मुख्य हेतू अपघातांचा प्रमाण कमी करणे असून ब्लॅक स्पॉटवर स्पीड ब्रेकर किंवा रम्बलर पट्टी,धोकादर्शक बोर्ड उभारणे, परावर्तक बसविणे , रस्त्यावर आवश्यक मार्किंग करणे यासारख्या उपाययोजना कराव्यात.असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.

      यावेळी लातूर  महानगर पालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी  अमर पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तत्पूवी  मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा साहित्याचे प्रकाशन, Good samiritoun Kit चे विमोचन ,शाळा व कॉलेजधील विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची पाठशाळा तकत्याचे अनावरणही करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील वाहन चालक युवराज घनराज कांबळे आणि संजय मसलगे 30 वर्षाहून अधिक विना अपघात चालकाचा मान मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिाकरी व्ही.टी. पाटील यांनी केले, सूत्रसंचलन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती एस.एस.पवार यांनी केले तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, वाहतुक पोलीस शाखा, राष्ट्रीय महामार्ग विभाग, शिक्षण विभाग,आरोग्य विभाग तसेच याविषयी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था ,पत्रकार आदि मोठया 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या