उदगीर
अतीख शेख प्रतिनिधी
पैशांच्या देवाण घेवाण कारणावरून आठ दिवसापूर्वी मारहाण झालेल्या एका युवकाचा शहरातील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांनी प्रेत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवत जोपर्यंत आरोपीला अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत जमावाने शहर पोलीस ठाण्यासमोर दगडफेक केली. या घटनेची माहिती शहरात कळताच अवघ्या अर्ध्या तासात शहर सामसूम झाले अनेक व्यापाऱ्यांनी दुकानेही बंद केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील तोंडार ऑटो पॉईंट चौकात दि. १३ रोजी रात्री आठच्या सुमारास पैशाच्या देवाण घेवाण वादातून आरोपी तानाजी फुले, राजकुमार बिरादार रा. हैबतपुर महेश बिरादार, शांतवीर बिरादार रा. मलकापूर यांनी संगनमत करत लोखंडी गज, काट्या व हॉकी स्टिकने फिर्यादीचा चुलत भाऊ बशीर अहमद सय्यद वय वर्षे ३० रा. हैबतपुर याला तू घेतलेले पैसे परत कर म्हणत शिवीगाळ केली. आरोपीने मयताच्या डोक्यात व मांडीवर मारहाण करूण गंभीररित्या जखमी केले होते. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली असल्याची फिर्याद चुलत भाऊ फिरोज निजामसाब सय्यद याने रविवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.