मुख्याध्यापिका रजिया शेख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
लातूर: प्रतिनिधी
लातूर महापालिकेच्या म.न.पा. उर्दू शाळा क्रमांक 13 च्या प्रभारी मुख्याध्यापिका शेख रजिया सुलताना महेबुब यांना राज्यस्तरील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोणावळा येथे पार पडलेल्या सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शेख रजिया सुलताना महेबुब यांना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटने तर्फे राज्यातील १०० शिक्षकांना आदर्श शिक्षक,आदर्श शाळा, प्रेरणा,कोरोना योद्धा व तंत्रमित्र आदी विविध विभागांमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी आ. संजय जगताप,संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कोळी, प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप, शिक्षण उपसंचालक औंदुबर ऊकिरडे, महाराष्ट्र राज्य न.पा. व म.न.पा. शिक्षक संघ जिल्हा अध्यक्ष श्रीमती महादेवी चिकाटे आणि राज्य महिला सदस्य श्रीमती मायादेवी कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शेख रजिया यांचे शिक्षण अधिकारी एम एल जाधव, जिल्हा अध्यक्ष श्रीमती एम पी चिकाटे, राज्य महिला सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.