शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व्यंकटेश ट्रॅक्टरर्सचे उद्घाटन
लातूर/प्रतिनिधीः- सध्याच्या युगात विविध कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. शेतकर्यांनी आपली शेती अधिक विकसित करून उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज असून सोनालिका ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून व्यंकटेश ट्रॅक्टर्सने ही संधी जिल्ह्यातील शेतकर्यांना उपलब्ध करुन दिलेली आहे. या संधीचा शेतकर्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या व्यंकटेश ट्रॅक्टर्सचा उद्घाटन समारंभ माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला मुरुड तालुक्यातील गुंफावाडी येथभल गणापुरे या शेतकर्यांस नवीन ट्रॅक्टर्सची चावी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आली.
भारतात आजही शेती हा व्यवसाय मुख्य असून अनेकांची उपजिवीका शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळेच शेतकर्यांनी आता बदलत्या युगासोबत स्वतः ला बदलून घेत अधिकाधिक नव्या तंत्रज्ञाचा वापर शेतीमध्ये करणे काळाची गरज झालेली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये आज क्रांतीकारी बदल घडत असून त्याचा फार मोठा फायदा शेती व्यवसायास होत आहे. त्यामुळेच शेतीमध्येही आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सोनालिका ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून करता येणार असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. नव्याने सुरु करण्यात आलेल्या व्यंकटेश ट्रॅक्टर्सचा जामिनदार मी असून शेतकर्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सोनालिका ट्रॅक्टर्सची खरेदी करावी, असे आवाहन करत या खरेदीसाठी सर्व साखर कारखाने बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांना मदत करतील अशी ग्वाही दिली.याप्रसंगी व्यकंटेश ट्रॅक्टर्सचे संचालक व्ही एन यादव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी माजी आ. त्र्यंबक भिसे, आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, दगडुसाहेब पडिले, व्ही. एन. यादव, नूर शेख, मनोज पाटील, मनिष जोशी, राज गहन, कन्हैय्या साहू यांच्याह शेतकरी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.