सावधान कोरोनाचा धोका टळला नाही, विना मास्क फीरु नका

 सावधान कोरोनाचा धोका टळला नाही,  विना मास्क फीरु नका  





औसा प्रतिनिधी

 औसा मार्च 2020 पासून देशभरात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झाले होतेे. सहा ते सात महिन्याच्या लााॅकडाऊन  काळानंतर  अनलॉक करून पुनश्च हरिओमला सुरुवात झाली. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येण्याची सुरुवातही झाली. परंतु अनलॉक काळात जनतेची बेफिकिरी आणि हलगर्जीपणा वाढत असून आता सावधानता बाळगण्याची गरज आहे. अद्यापि कोरोना विषाणूूंचा धोका टळलेला नसून हलगर्जीपणा महागात पडू शकतो, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. शाळा, महाविद्यालये, कारखानदारी, सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यानंतर मंदिरे ही जनतेच्या मागणीमुळे उघडण्यात आली. परंतु सार्वजनिक प्रवासी वाहतूक करताना तसेच मंदिर व धार्मिक कार्यक्रमात राजरोसपणे नागरिक विना मास्क फिरत आहेत. लाॅकडाऊन काळात होणारे मोजक्या लोकांच्या उपस्थितीतले विवाह सोहळे आता पूर्वीप्रमाणे मोठ्या थाटामाटात गर्दी करीत साजरे केले जात आहेत. धार्मिक यात्रा आणि उत्सव वगळता सर्वच व्यवहार सुरू झाले असून बँकींग, प्रत्येक कार्यालय आणि बाजारपेठेत गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना विषाणूंवर लस उपलब्ध झाली असली तरी. ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे,  त्यांनाही रिएक्शनला तोंड देण्याची पाळी आली आहे. कोरोना विषाणूंवर लस उपलब्ध झाली असली तरी ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. कोरोना विषााणूंवर लास उपलब्ध झाली असली तरी ही लस म्हणावी तशी प्रभावी नसल्याची चर्चा अधिक प्रमाणात होत आहे. जनतेच्या आरोग्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी, सामान्य जनता मात्र कोरोना विषाणूंकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आणखी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला नसल्याचे दिसते. त्यामुळे सर्व जनतेने स्वतः सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा धोका टळला अशा अविर्भावात न वावरता हलगर्जीपणा सोडून प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर दक्षता घेणे व तोडाल मास्क लावने अत्यंत  गरजेचे आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या