मास्क नाही तर प्रवेश नाही'.

 'मास्क नाही तर प्रवेश नाही'.....






आँखों देखा हाल-आज घेतलेला अनूभव-प्रश्नचिन्ह?महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'मास्क नाही तर प्रवेश नाही' या संकल्पने नूसार रोजच लालपरी धावत आहे,परंतू मास्क ची सूट लालपरीचे वाहक आणि चालकाला शासनाने दिलेली आहे वाटतं...कायदा,संकल्पना हे फक्त जनतेसाठीच का? तोंड वर करून ये..ये..हे..हे...मास्क कूठंय,ये मास्क कूठंय असं तोंड वासून जनतेला सांगणारी बया तूझं मास्क कूठंय..ये..तूझं.मास्क कूठंय..मग विचार करायची गोष्ट आहे की,अशी वागणूक शासन स्तरावर होत असेल,दिलेल्या सूचनाचं पालन जर हेच करत नसतील तर यांना काय अधिकार,ये मास्क कूठंय विचारायचं..मग यांना कोण दंड लावणार..सुरूवात स्वता पासून केली तर बघणारे लाजून आपोआप नियम पाळतील...मग नियम लावणारेच नियम तोडत असतील तर मग काय? सध्या परत कोरोनाने डोकं वर काढलंय,आपल्या प्रत्येकाला काळजी घ्यायची गरज आहे..म्हणून मास्क कूठंय अस सांगणा-यांनी अगोदर मास्क घालावं जेणेकरून बघणा-याला वाटेल कि खरंच..मास्क नाही तर प्रवेश नाही..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या