पिकाच्या अंतर मशागतीसाठी लहान ट्रॅक्टरची गरजःकृषी सभापती चिलकुरे
लातूर,दि.१९ःशेती हा देशाला पोसणारा प्रमुख घटक असून,त्यावर वर्षानुवर्षे केवळ चर्चा होतेय, तरीही शेतीत खपणार्या बळीराजांचा आजही विकास होत नाही ,अशी खंत व्यक्त करुन अलिकडे शेतीच्या कामासाठी मजूरांची वाणवा आणि न परवडणारी बेैलजोडी याला पर्याय म्हणून कंपन्यांनी पिकाच्या आंतरमशागतीसाठी आता लहान लहान ट्रॅक्टरची निर्मिती करण्याची गरज असल्याचे मत जिल्हा परिषदेचे सभापती गोविंदराव चिलकुरे यांनी व्यक्त केले.
दगडोजीराव देशमुख चौक,बाभळगाव नाका येथील व्ही.एम.भोसले यांच्या राही ट्रॅक्टर्सच्या शोरुमचा शुभारंभ शुक्रवार,दि.१९ फेबु्रवारी २१ रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून करण्यात आला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिलकुरे बोलत होते.अध्यक्षपदी जि.प.सदस्य रामचंद्र तिरुके हे होते.मंचावर फोर्स मोटार्स लि.चे डेप्युटी आर.एम. जितेंद्र नंद, महाराष्ट्र सर्व्हिस हेड शेखर गाढवे, रिटेल मॅनेजर नरेंद्र खरोटे,सर्व्हिस इंजिनिअर अमित सिंग,नांदेड येथील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मॅनेजर प्रशंात सूर्यवंशी,माजी शिक्षण उपसंचालक गोस्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सध्याचे युग यांत्रिकीकरणाचे असल्याने शेतकर्यांनी आधुनिक यंत्रांचा अवलंब करावा लागेल,शेतकर्यांनी देशाला अन्नधान्यात संपन्न केले असले तरी त्याला मात्र कंगाल राहण्याचीच वेळ आली आहे.हे चित्र बदलण्यासाठी पोखरा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व गावांना मिळण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव करुन शासनाकडे आग्रह धरावा अशी मागणी अध्यक्षीय समारोपात रामचंद्र तिरुके यांनी केली.
यावेळी फोर्स मोटार्सचे नंद यांनी १९४४ला स्थापन झालेल्या आमच्या कंपनीेने १९७० ला ऑटोरिक्षा बाजारात आणला,त्यानंतर टेम्पो,ट्रॅक्स, टँक्टर ही देशी वाहने तयार करुन सर्व घटकांची सेवा केली.यापुढेही शेतपूरक वाहने आणून सेवा दिली जाईल अशी ग्वाही दिली.राही ट्रॅक्टर्सचे व्ही.एम.भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सेल्स मॅनेजर रविकिरण भोसले यांनी आभार मानले.सूत्रसंचालन बाळ होळीकर यांनी केले.कार्यक्रमासाठी सेल्स मॅनेजर सुहास शंकरशेटे, दत्ता शिंदे,विनोद खांडके,नितीन चालक आदिंनी सहकार्य केले.
प्रारंभी छ.शिवाजीराजे भोसले यांच्या पुतळ्यास मार्ल्यापण करुन,दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा शाल, पुष्पहाराने तसेच ,मोठा सन्मान शिवाजी जाधव व छोटा आर्चड ट्रॅक्टर खरेदीदार शेतकरी व्यंकट सोट तसेच राजाभाऊ गजेंद्र, गोविंद शेळके,साधू पवार, एचडीएफसी बँकेचे गोविंद शिंदे,अमोल शिंदे,निलंगा वितरक प्रफुल्ल पौळ यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला माजी प्राचार्य बी.एम.काळे, प्रा.डॉ.उत्तम गायकवाड, मनपा क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी,प्रा.सतीष नेलवाडे, भाजपाचे प्रा.पंडितराव सूर्यवंशी,ऍड.भारल साबदे, एन.डी.गायकवाड आदी उपस्थित होते.
Attachments area
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.