राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी सय्यद मुस्तफा यांची निवड....
औसा प्रतिनिधी /
मुख़्तार मणियार /आफताब शेख
-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुल्हन, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी अॅड. सय्यद मुस्तफा अब्दुल मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विचारा नुसार ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाला बळकटी द्यावी अशी अपेक्षा नियुक्तीपत्र देवून व्यक्ती केली आहे. त्यांच्या निवडीचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, उपनगराध्यक्ष अलीशेर कुरेशी, माजी नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख, मेहराज शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, अविनाश टिके, कृष्णा सावरकर आदींनी स्वागत केले आहे...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.