सत्तरधरवाडी येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप...

 सत्तरधरवाडी येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप...






औसा प्रतिनिधी/- जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणार्‍या दिव्यांगांच्या साहित्याचे वितरण सत्तरधरवाडी येथे सरपंच हिरू टिल्लू आडे व उपसरपंच श्रीनाथ बंडगर यांच्या हस्ते गुरुवार दि. 18 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर कवठे, शांताबाई राठोड, ग्रामसेवक एस एच आडे, ग्राम रोजगार सेवक शिवराज पाटील, लिपिक अच्युत गायकवाड, ऑपरेटर रोहिणी राठोड, अनिता चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत गायकवाड, शिवाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. सत्तरधरवाडी  ग्रामपंचायत अंतर्गत दगडू चव्हण ,गिरिराज चव्हाण, लक्ष्मीबाई राठोड, पार्वतीबाई राठोड, रामराव चव्हाण, संजय राठोड, संतोष पांढरे, सोमनाथ ढगे, सुनिता चव्हाण, सतीश राठोड या लाभार्थ्यांना दिव्यांगांचे व्हीलचेअर, श्रवणंत्र, काठी, तीन चाकी सायकल, कृत्रिम पाय इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या