लातूर जिल्हयातील लातूर (शहर), लातूर (ग्रामीण), औसा, रेणापूर, निलंगा, चाकूर,
शिरूरअनंतपाळ व देवणी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्यांची घोषणा
कोणताही पात्र लाभार्थी शासन मदती पासून वंचीत राहू नये
याची दक्षता घ्यावी पालक मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सुचना
लातूर प्रतिनिधी : १५ फेब्रुवारी २१ :
लातूर जिल्हयातील लातूर (शहर), लातूर (ग्रामीण), औसा, रेणापूर, निलंगा, चाकूर, शिरूर अनंतपाळ व देवणी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष व सदस्यांची पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी घोषणा केली आहे. जिल्हातील एकही पात्र लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही यांची काळजी समिती सदस्य घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना पालकमंत्री ना. अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धिरज देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या नव्याने निवडूण आलेल्या समित्यामध्ये हकीम अमिर हमजा शेख (लातूर शहर), प्रवीण हनुमंतराव पाटील (लातूर ग्रामीण), गोविंद दिलीप पाटील (रेणापूर), देवदत्त अनंतराव पाटील (निलंगा) दत्तात्रय निवृत्ती बडगर (शिरूरअनंतपाळ), अब्दुल करीस रसुलसाब गुळवे (चाकूर) बबन गंगाधर भोसले (औसा) व वैजनाथ मन्मथअप्पा लुल्ले (देवणी) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
लातूर शहर अध्यक्षपदी हकीम अमिर हमजा शेख
लातूर शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी हकीम अमिर हमजा शेख तर सदस्य म्हणून सर्वश्री भालचंद्र बाबुराव सोनकांबळे, श्रीमती अजंनी राजू चिंताले, बंडू भानुदास सोळंकर, शेख फारूक मौलाना तांबोळी, मनोज वसंतराव देशमुख, शेख बरकत खुदरतुल्ला, राहूल सुभाष रोडे, नरेश नानासाहेब कुलकर्णी, दगडू करबसप्पा मिटकरी यांची निवड कदण्यात आली आहे.
लातूर ग्रामीण अध्यक्षपदी प्रविण हणमंतराव पाटील
लातूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी प्रवीण हनुमंतराव पाटील (धनेगाव) तर सदस्य म्हणून सर्वश्री अमोल दासराव देडे (गोंदेगाव),सौ.शितल राजकुमार सुरवसे (चिंचोली),धनंजय धोंडीराम वैद्य (जेवळी),हरीश रामकिशन बोळंगे (भातांगळी),अमोल विजयकुमार भिसे (गादवड),संजय रोहिदास चव्हाण (कानडी बोरगाव),परमेश्वर बसवंत पवार (नागझरी),रमेश श्रीरंग पाटील (पेठ),आकाश कणसे (मुरुड) यांची निवड कदण्यात आली आहे.
रेणापुर अध्यक्षपदी गोविंद दिलीप पाटील
रेणापूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी गोविंद दिलीप पाटील तर सदस्य सर्वश्री रुपेश जनार्दन चक्रे (रेणापुर), श्रीमती प्रेम शंकर कस्पटे (पानगाव), ॲड.प्रशांत नारायण आकनगिरे (रेणापुर), ॲड. शेषराव केशवराव हाके (कोळगाव), बाळकृष्ण विनायकराव माने (दर्जी बोरगाव), अंगद दिलीप सोळंके (मोटेगाव), व्यंकट साहेबराव पाटील (गरसुळी), डॉ. उमाकांत सुभाषराव देशमुख (डिघोळ देशमुख), कुलदीप राजकुमार सूर्यवंशी (अरजखेडा) यांची निवड करण्यात आली आहे.
निलंगा अध्यक्षपदी देवदत्त अनंतराव पाटील
निलंगा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी देवदत्त अनंतराव पाटील (हलगरा) तर सदस्य सर्वश्री गोविंद प्रल्हाद सूर्यवंशी (हाडगा), श्रीमती राजमाता श्रीकांत दानाई (उस्तुरी), गोविंद रामजी शिंगाडे (निलंगा), नागनाथ बसंन्ना पाटील (कोराळी), विनोद अशोक आर्य (निलंगा), समद करीम साब लालटेकडे (निलंगा), सुरेंद्र निळकंठराव धुमाळ (मुगाव),दिलीप त्रिंबकराव पाटील (मदनसुरी), व्यंकटराव काशिनाथ पांचाळ (मन्मतपूर) यांची निवड करण्यात आली आहे.
शिरूरअनंतपाळ अध्यक्षपदी दत्तात्रय निवृत्ती बंडगर
शिरूर अनंतपाळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय निवृत्तीु बंडगर (बोळे) तर सदस्य सर्वश्री रमेश ज्ञानोबा सोनवणे (हिंप्पळगाव),श्रीमती शुभांगी हंसराज बिराजदार (सुमठाणा), भागवत प्रल्हाद वंगे (आनंदवाडी), वैशंपायन वैजनाथ जागळे (राणी अंकुलगा), संजय शेषराव बिराजदार (हिसामाबाद), मनोहर निवृत्ती काळे (तळेगाव बोरी), विठ्ठल श्रीमंतराव पाटील (शेंद), संदीप प्रकाश धुमाळे (शिरूर आनंतपाळ), महताब लतीपसाब शेख (तुरुकवाडी) यांची निवड करण्यात आली आहे.
चाकूर अध्यक्षपदी अब्दुल करीम रसूलसाहब गुळवे
चाकूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी अब्दुल करीम रसूलसाहब गुळवे (चाकूर), तर सदस्य सर्वश्री मिलिंद गणपती महालिंगे (चाकूर), श्रीमती निकिता तिरुपती पाटील (हाडोळती), सावता पंडू माळी (आष्टा), पांडुरंग दत्तू धडे (ओढाळ), शेख हुसेन रज्जाक कसाब (चाकूर), गणपती संभाजी शिंदाळकर (नळेगाव), सोमनाथ दिनयया स्वामी (चाकूर), लक्ष्मण विश्वंभर पेटकर (चापोली), निलेश सतीशराव देशमुख (नायगाव) यांची निवड करण्यात आली आहे.
औसा अध्यक्षपदी बबनराव गंगाधर भोसले
औसा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी बबनराव गंगाधर भोसले (शिवणी) तर सदस्य सर्वश्री ॲड. मंजुषा रघुनाथ हजारे (औसा),श्रीमती जयश्री भिमाशंकर उटगे (औसा), प्रकाश माधवराव मिरगे (किल्लारी),श्रीहरी व्यंकट काळे (गोंद्री), शेखर प्रल्हाद चव्हाण (उजनी), अश्रफ कुर्बान शेरीकर (उजनी),दिनकर मधुकर मुगळे (जावळी), नरेंद्र राजेंद्र पाटील (आलमला), रामेश्वर विश्वनाथ पाटील (भादा) यांची निवड करण्यात आली आहे.
देवणी अध्यक्षपदी वैजनाथ मन्मथअप्पा लुल्ले
देवणी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी वैजनाथ मन्मथअप्पा लुल्ले (देवणी) तर सदस्य सर्वश्री यशवंत शामराव सोनकांबळे (जवळगा), सौ.मेहराज फेरोज शेख (देवणी), औंदुबर रामराव पांचाळ (होनाळी), गणपतराव सदाशिल पाटील (हिसामनगर), कृष्णा लक्ष्मणराव पाटील (बोरूळ), इद्रिसमीया असममिया भाताद्रे (देवणी), पंडीत किशनराव भंडारे (वलांडी), अनिल वैजनाथराव इंगोले (देवणी), बालाजी विश्वनाथ बिराजदार (चवणहिप्परंगा) यांची निवड करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी समितीमधील अशासकीय सदस्यांनी गाव पातळीवर आणि पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचुन शासनाची योजना तळागाळात राबवून यशस्वी करण्याचे आवाहन ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.