रणरागीनीचे अभियान संपन्न

 रणरागीनीचे अभियान संपन्न






औसा(सा.वा.)दि.१    महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत किल्लारी   येथे पाच रनरागिणी  म्हणजेच वरधनी यांनी दिनांक नुकतेच  किल्लारी मध्ये  अभिमानाची  सुरुवात केली, या  दरम्यान पहिले  तीन  दिवस ग्रामपंचायत कार्यालयास  भेट  दिली, व  गावाची  पाहणी करण्यासाठी गाव फेरी  काढण्यात आली, त्या  नंतर सायंकाळी शाळा  बंद  असल्यामुळे प्रत्येक  वस्तीतील  मुलां-मुलींना सोबत  घेऊन  भव्यदिव्य मशाल फेरी काढण्यात आली, त्या मशाल फेरीचा समारोप आम सभेमध्ये  करण्यात आले ,सर्व महिला व पुरूष  यांनी  अभियान  म्हणजे  काय , याची  माहिती दिली,  व  पहिले  तीन  दिवस सर्वेक्षण  केले, पुढील  सात  दिवस  नावे व  जुने गट बांधणी  ,व त्याच बरोबर लेखिका  प्रशिक्षण,  घेण्यात आले, व उर्वरित दिवसात गट  बांधणी केली,  आणि मुख्य म्हणजे 15 दिवस केलेल्या कामाचा  आरसा,  म्हणजे  आम  सभा  घेऊन सर्व महिलांन समोर  आरसा रुपी  काम सादर  करणे,  ही सभा आम्ही  दिनांक  28/01/2021 रोजी  सकाळी 10 वा. सुरुवात  केली,  या सभे साठी  आवर्जुन  उपस्थित असलेले  आमचे तालुका अभियान कक्षाचे    किशोर  अहिरे    ,महाराष्ट्र   बँकचे   मॅनेजर  प्रमोद अभियान कक्षाच्या  किल्लारी प्रभागासाठी काम  करणार्‍या  गीता माने ,  एसबीआय  व  महाराष्ट्र  बँ केचे स्वामसहाय्यता  समूह गटातील  महिलांसाठी  काम करत  असलेल्या रणरागीणी स्वामी  ,किल्लारी  गावासाठी  आदर्श असणारे  शहा   ,व  गावच्या  लाडक्या  सरपंच  सैला  या  मान्यवरांनी आम सभेची  शोभा  वाढवीत, त्यांनी  मोलाचे  मार्गदर्शन केले. व  शाश्वत उपजीविका उभी  करण्याची  असो  किंवा नियमित  आरोग्याची  काळजी घेणे  असो  ,किंवा  येणार्‍या सर्व योजनांत  पात्र  कश्या  होऊ  शकतील  ,अभियानाच्या दस सूत्र किशोर  अहिरे   यानी महिलांना  मार्गदर्शन  केले, त्याच बरोबर   दिन दयाळ  उपाध्याय  योजना  काय आहे,  याचे ही  स्पष्टीकरण केले,  त्याच  बरोबर  किल्लारी गावाचे महाराष्ट्र  बँक मॅनेजर प्रमोद   यानी   खुप मोलाचे सुंदर  असे  मार्गदर्शन केले समूहातील  महिलांनी  स्वतःची  काळजी कशी  घेतली  पाहीजे हे  पटवून  दिले, व या आम सभेचा  भाग  म्हणजे  या साठी अलका लोखंडे यांनी महिलांना  आवाहन केले, 200 ते 250 महिलां मधून  5 महिला  उमेदवार  म्हणुन  उभे राहिले,  मतदानाच्या  माध्यामातून  जयश्री  कांबळे  यांना गावातील महिलांनी बहुमताने निवडून दिले  म्हणुन  जयश्री  कांबळे  यांना  निवडण्यात  आले  ,आशा  पद्धतीने 15 दिवशी  निवासी  राहून जबरदस्त आम  सभा  घडून  आणणार्‍या  रान रागिणी  म्हणजेच  वरधनी अलका लोखंडे  , सुनिता  उबाळे,  शीला  भामरे  , वर्षा  कदम  , अनुसया  सुगावा या  सर्व रणरागीनीने  मेहनतीने    कार्य  केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या